Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : आईने अडवले होते,पण त्यानेच उघडले मृत्यूचे दार !

Nagpur News : 'अरे धावा ... माझ्या लेकराला वाचवा '... मुलावर धारदार शस्त्राने सपासप वार होत असताना आई जीवाच्या आकांताने मदतीसाठी धावपळ करीत होती. मात्र, काही क्षणातच डोळ्यांसमोर तिच्या काळजाचा तुकडा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 14, 2026 | 02:38 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • आईलाही दिली ठार मारण्याची धमकी
  • मागील आठवड्यातच झाला होता वाढदिवस
  • आईनेच दिला अखेरचा आधार
Nagpur News :  मध्यरात्री जरिपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरात घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. शर्मा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जुन्या वैमनस्यातून राजवीर शर्मा (१८, रा. कुशीनगर) याची निघृण हत्या केली तर मध्यस्थीसाठी धावलेला मित्र नयन सोनबरसे याच्यावरही वार केले. नयनवर उपचार सुरू आहे. याप्रकरणी जरिपटका पोलिसांनी राज इलमकर (२२), रोहित इलमकर (२०) आणि हनी डोंगरे (२५, तिघेही रा. कुशीनगर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर बहिणीच्या घरून घरी परतत असताना आरोपींनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर गालावर झापडही मारली. त्यानंतर राजवीर घरी परतला. तो रागात असल्याचे पाहून आईने विचारपूस केली. राजवीरने घरातून दांडा घेतला.
त्याचा राग पाहून आईने घराबाहेर जाऊ नये म्हणून दार बंद केले. मात्र, काही वेळाने राजवीर कसातरी घराबाहेर पडला. राजवीर दिसताच आरोपींनी पुन्हा वाद घातला. आरोपींनी धारदार शस्त्र काढून राजवीरवर जीवघेणे वार करण्यास सुरुवात केली. मुलावर हल्ला होत असल्याचे पाहून आई घटनास्थळी धावली आणि ‘माझ्या लेकराला वाचवा’ अशी आर्त हाक देत मदतीसाठी आरडाओरड करू लागली.

Nagpur News : ‘नागपूर तो झांकी है, आझाद मैदान बाकी है’ ; कंत्राटदार उतरले रस्त्यावर

आईलाही दिली ठार मारण्याची धमकी

राजवीरला रक्तबंबाळ केल्यानंतरही त्यांनी हल्ला थांचवला नाही. आई आरडाओरड करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर इलमकर बंधूनी ‘ही राजवीरची आई आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर तिचाही खून करू’ अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. राजवीरचा मित्र नयन सोनबरसे मध्यस्थी करण्यासाठी आला असता आरोपीनी त्याच्यावरही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात घडलेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी राजवीरला मृत घोषित केले, नयनवर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

Nagpur News : एनएमआरडीएची ताकद वाढली ;१६० पदांच्या पुनर्रचना प्रस्तावाला मंजुरी

मागील आठवड्यातच झाला होता वाढदिवस

राजवीर नुकताच ७ ऑगस्टला १८ वर्षांचा झाला होता. वाढदिवसाचा आनंद साजरा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याच्यावर काळाने झडप घातली. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची मोठी बहीण विवाहित आहे. आई रुग्णालयात स्वागतकक्षात काम करते तर वडील ट्रकचालक आहे.

आईनेच दिला अखेरचा आधार

राजवीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना आईनेच त्याला हात देत रुग्णालयात पाठवले, प्राथमिक -तपासात जुन्या किरकोळ वादातून हल्ला झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपीच्या अटकेनंतर हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Nagpur news his mother had tried to stop him yet he was the one who opened the door to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Nagpur Crime News
  • Nagpur Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
1

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
2

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
3

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
4

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.