'त्या' 31 गावांचा यंदाही संपर्क तुटणार; मुख्य रस्ते आणि नदी, नाल्यांवर पूलच नाहीत
अतिदुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून अहेरीची ओळख आहे. तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे मुख्य रस्ते आणि नदी, नाल्यावर पूल नाही. काही ठिकाणी ठेंगणे पूल असल्याने पावसाळ्यात तब्बल 31 गावे संपर्काच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
तालुक्यात आलापल्ली, महागाव, पेरमिली, कमलापूर, जिमलगट्टा व देचलीपेठा असे 6 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यात आलापल्लीत 7 उपकेंद्र व 1 आरोग्य पथक, महागावमध्ये 8 उपकेंद्र व 1 आरोग्य पथक, पेरमिलीत 5 उपकेंद्र, कमलापूरमध्ये 9 उपकेंद्र व 1 आरोग्य पथक, जिमलगट्टामध्ये 5 व 1 आरोग्य पथक, देचलीपेटामध्ये 3 उपकेंद्र असे 37 उपकेंद्र व 4 आरोग्य पथकातून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, अहेरीच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत 174 गावे असून 29 हजार 500 कुटुंब व 1 लाख 20 हजार 550 इतकी लोकसंख्या आहे. दुर्गम भागातील अनेक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटत असतो. अशावेळी गरोदर माता व रुग्णांची भेट घेताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. या भागात मुसळधार पाऊस झाल्यास नदी-नाल्यांना पूर येतो. तेव्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पुलाचे काम सुरू असल्याने परिस्थिती गंभीर होणार असल्याचे दिसून येत आहे.
‘पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमधील गरोदर मातांना प्रसूतीसाठी अडचण येऊ नये यासाठी जिल्ह्यात ‘माहेरघर’ संकल्पना राबविण्यात येते. त्या अनुषंगाने देचलीपेठा, जिमलगट्टा, कमलापूर व पेरमेली या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बनविण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गरोदर मातांना याठिकाणी ठेवून त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाते.
आलापल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात कल्लेम, महागाव केंद्रात बट्रा (बु), कोत्तागुडम, बट्टा (खुर्द), कमलापूर केंद्रात मोडुमडगू, चिटवेली, चितारेव, तोंडेर, जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात आवलमरी, वेंकटापूर, करनेली, लंकाचेन, आंबेझरा, वेचलीपेठा केंद्रात कल्लेड, लोवा, कॉजेड, येलारम, कम्मासूर, पत्तीगाव, कोत्तागुडम, पेरकाभट्टी व पेरमिली प्राथमिक आरोग्य कें द्रात कोडसेपल्ली, येरमनार, कपेबंचा, कवठारम, येरमनार टोला, पालेकसा. कुरुमपल्ली, रापल्ले, एकरा पल्ले असे एकूण 31 गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर जातात.
Mumbai Rain Update : मुसळधार पावसामुळे रेल्वेवाहतूकीचे तीन तेरा ; बदलापूर ते सीएसएमटी लोकलला गळती
पावसाळ्यात ज्या गावात जाणे शक्य नाही, त्या विकाणी औषधीसाठा पोहोचविण्यात आला आहे. आरोग्यसेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती घेतली जाते. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2025 पर्यंत 1 हजार 195 एएनसीची नाँच झाली आहे. वेळोवेळी त्यांचे ट्रकिंग व फॉलोअप घेतले जात आहे.
– डॉ. किरण वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी, अहेरी