लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण; लोखंडी पाईपने...
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपूरच्या हुडकेश्वर भागातील स्वागतनगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी बल्ली आणि हेल्मेटने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा युवक गंभीर जखमी झाला असून, हुडकेश्वर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी (दि.११) रात्री दहाच्या सुमारास ब्रम्हानगर, जुना नरसाळा मार्गावर घडली.
विठ्ठल निंभोरकर (वय ३०, रा. वनराईनगर, मानेवाडा) हा मित्र विक्की खडसे (वय ३१) याला घरी सोडण्यासाठी दुचाकीने जात होता. हातात लाकडी बल्ली घेऊन एकाने विक्कीला अडवले आणि स्वागतनगर येथील जिमजवळ सोडण्यास सांगितले. विक्कीने नकार दिल्याने आरोपी संतापला आणि शिवीगाळ केली. महत्त्वाचे म्हणजे आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने गाडीच्या हँडलला लटकवलेले हेल्मेट काढून विक्कीच्या डोक्यावर मारण्यास सुरुवात केली. तसेच, लाकडी बल्लीने डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. विठ्ठलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यालाही बल्लीने मारहाण केली.
दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या आरोपीच्या भावानेही विक्कीला मारण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी विक्की खडसेला उपचारासाठी मेडीकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी संजय हेमने (वय २६) व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
कल्याणमध्ये दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला
कल्याण शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठी भाषा येत नाही म्हणून कल्याण पूर्वेकडील एका खानावळीत नशेखोर तरुणांच्या टोळक्याने भयानक तोडफोड केली. एवढेच नाही तर तिथे कामकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना हल्ला चढवून त्यांना बेदम मारहाण केली.
हेदेखील वाचा : Kalyan Crime: मराठी न येण्याच्या कारणावरून नशेखोर तरुणांचा हल्ला; खाणावळीत तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण






