Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील पहिल्या एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना होणार साकार – मुख्यमंत्री फडणवीस

देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: May 30, 2026 | 04:32 PM
Integrated urban solid waste processing project, Nagpur, Bhandewadi, CM Devendra Fadnavis, solid waste processing project,

Integrated urban solid waste processing project, Nagpur, Bhandewadi, CM Devendra Fadnavis, solid waste processing project,

Follow Us
Follow Us:

नागपूर, दि. 30 : देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भांडेवाडी परिसरात केवा सुस बडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातर्फे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, केवा सुसबडे या प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर, फायनान्स डायरेक्टर विनोद तणदोन, उपाध्यक्ष विजय चिपळूणकर तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्र तीन टप्प्यात पूर्ण होणार असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरातील 1 हजार 200 मेट्रिक टन कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ओला व सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेनंतर बायोगॅस, कंपोस्ट खत तसेच सुक्या कचऱ्यापासून पावर प्लेट्स इंधन तयार होणार आहे.

भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे 30 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून गॅस विक्रीतून महानगरपालिकेला दरवर्षी 15 लाख रुपयांची रॉयल्टी सुद्धा मिळणार आहे. पर्यावरण पूरक या प्रकल्पासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे पुढच्या काळात शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया सुलभ होणार असून नागपूर शहर हे घनकचरा व्यवस्थापन तसेच कचरा मुक्त शहर म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाईल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!

या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बायोगॅस वर शहरातील 198 बसेस साठी सीएनजी ही ग्रीन एनर्जी उपलब्ध होणार आहे. खासगी भागीदारी तत्त्वावर सुरू होणाऱ्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला कुठलाही खर्च येणार नसून शहरात निर्माण होणाऱ्या 1 हजार 300 मेट्रिक टन कचरा व्यवस्थापनावर होणारा दैनंदिन खर्च वाचणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होईल. महाजनको साठी लागणाऱ्या एनर्जी प्लेट्स सुद्धा उपलब्ध होणार आहेत.

कचऱ्यापासून खत व खतापासून बायोगॅस, कंपोस्ट खत, पॉवर प्लेट्स आदी निर्माण करणारा हा प्रकल्प अत्याधुनिक असल्यामुळे पर्यावरणासाठी आदर्श प्रकल्प म्हणून संपूर्ण भारतात ओळखल्या जाईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रारंभी केवा सुजबडे या प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर यांनी संपूर्ण प्रकल्पाची व घनकचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रिये संदर्भात माहिती दिली. महापौर नीता ठाकरे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी या प्रकल्पासाठी महानगरपालिकेतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

“हा काय मूर्खपणा आहे?” NEET पेपरफुटी रोखण्यासाठी वायुसेनेची मदत; केंद्राच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर संतप्त

Web Title: Integrated urban solid waste processing project is being implemented in nagpurs bhandewadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?
1

Nagpur News : पश्चिम नागपुरात DJच्या सुरांचा सवाल; यंदा DJ वाजणार की बंदी कायम?

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई
2

Nagpur News : सभापतींच्या वाहनावर ‘महाराष्ट्र सरकार’चा फलक; GADची कारवाई

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
4

Ukraine War: नागपूरकडून 770 कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी करून एस्टोनियाच्या संरक्षण मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.