Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Narwekar: ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला, तर काँग्रेसवरही जोरदार निशाणा

Rahul Narwekar on Uddhav Thackeray: जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या उद्धव ठाकरेंवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोरदार टोला लगावला. संसदेचे अधिवेशन सुरू असताना रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांनी जबाबदारीची आठवण करून दिली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 22, 2026 | 05:24 PM
'उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात'; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला (Photo Credit- X)

'उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात'; राहुल नार्वेकर यांचा थेट टोला (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘उद्धव ठाकरे नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडतात’
  • राहुल नार्वेकर यांची थेट टोला
  • काँग्रेसवरही जोरदार निशाणा
मुंबई: दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहभागी झाल्यावरून राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करताना, “त्यांना नेहमी चुकीचेच व्यासपीठ निवडण्याची सवय आहे,” असा टोला लगावला आहे. यासोबतच, संसदेचे अधिवेशन सुरू असताना रस्त्यावर उतरून विरोध करणाऱ्या राहुल गांधी आणि काँग्रेसवरही नार्वेकरांनी जोरदार निशाणा साधला.

संसद हे लोकशाहीचे मंदिर, चर्चा सभागृहातच व्हावी

मुंबईत पत्रकारांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर तीव्र आक्षेप घेतला. नार्वेकर म्हणाले, “लोकशाहीत संसदेला सर्वोच्च मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते, तेव्हा सर्व चर्चा आणि वादविवाद हे लोकहितासाठी सभागृहाच्या आतच झाले पाहिजेत. संसदेला सोडून रस्त्यावर जाऊन आंदोलन करणे आणि त्याला प्राथमिकता देणे लोकशाहीसाठी योग्य आहे का?”

Mumbai, Maharashtra: On the Congress staging a protest near the Prime Minister’s residence, State Legislative Assembly Speaker Rahul Narwekar says, “Expressing protest and opposition is every individual’s right, it is the opposition’s right. However, expressing that protest in a… pic.twitter.com/ZJBHIQL41u — IANS (@ians_india) July 22, 2026

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अमान्य, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; ठाकरे-केजरीवाल यांचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

विरोध दाखवणे हक्क आहे, पण जबाबदारीची जाणीव हवी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत काळे कपडे घालून नोंदवलेल्या निषेधावर बोलताना नार्वेकर म्हणाले, “अस्वस्थता व्यक्त करणे किंवा विरोध दर्शवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, विरोधी पक्षाचाही तो अधिकार आहे. परंतु, तो विरोध घटनात्मक मार्गाने दर्शवणे अधिक महत्त्वाचे आहे. विरोध करणे जर तुमचा अधिकार असेल, तर तो जबाबदारीने मांडणे हे तुमचे कर्तव्य आहे. जे लोकप्रतिनिधी स्वतःच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत, त्यांना जनताच त्यांची योग्य जागा दाखवून देईल.”

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे उद्घाटन

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना नार्वेकर म्हणाले, “रक्तदान हीच खरी मानवसेवा आहे. गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याचे हे पवित्र कार्य आहे. नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवेची ही परंपरा अधिक समृद्ध करावी,” असे आवाहनही त्यांनी केले.

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Web Title: Rahul narwekar slams uddhav thackeray over jantar mantar protest visit marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • CJP Protest
  • Congress
  • devendra fadnavis
  • New Delhi
  • Rahul Narwekar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अमान्य, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; ठाकरे-केजरीवाल यांचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा
1

‘विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अमान्य, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या’; ठाकरे-केजरीवाल यांचा जंतर-मंतरवरील आंदोलनाला पूर्ण पाठिंबा

CJP Protest : CJP आंदोलनावर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी; CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला
2

CJP Protest : CJP आंदोलनावर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी; CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला

CJP Protest: आंदोलनादरम्यान ‘CJP’ची महत्वाचे विधान! ‘सरकारसोबत चर्चेला तयार, पण जागा तटस्थ असावी’
3

CJP Protest: आंदोलनादरम्यान ‘CJP’ची महत्वाचे विधान! ‘सरकारसोबत चर्चेला तयार, पण जागा तटस्थ असावी’

Yashomati Thakur On Dattagiri Maharaj : दत्तगिरी महाराजांवरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करा
4

Yashomati Thakur On Dattagiri Maharaj : दत्तगिरी महाराजांवरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.