
फोटो सौजन्य सोशल मीडिया
मात्र, प्रत्यक्षात होणारी मालवाहतूक नागपुरातून वाढण्याऐवजी सातत्याने कमी होत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांची आकडेवारी या चिंतेला अधोरेखित करते. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत नागपूर विमानतळावरून एकूण ४,८१७.२ मेट्रिक टन माल रवाना झाला. गतवर्षी याच सात महिन्यांत हीच आकडेवारी ५,४९०.६ मेट्रिक टन होती. म्हणजेच यंदा तब्बल ६७३.४ मेट्रिक टनांची घट झाली आहे. नागपूरला खऱ्या अर्थाने कार्गो हब बनवायचे असेल तर प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच अधिकाधिक देशांशी थेट विमान कनेक्टिव्हिटी निर्माण करावी लागणार आहे.
Nagpur Bomb Threat : बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ; शाळांसमोर पोलिसांचा तळ, युद्धपातळीवर तपास
२०२६ मध्ये जुलैपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक मिळून ४,८१७.२ मेट्रिक टन माल रवाना झाला. त्यात परदेशात गेलेल्या मालाचे प्रमाण केवळ ३७.७ मेट्रिक टन आहे. गतवर्षी याच कालावधीत एकूण ५,४९०.६ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली होती. त्यापैकी ४५.५ मेट्रिक टन माल आंतरराष्ट्रीय मार्गाने गेला. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कार्गोमध्येही यंदा ७.८ मेट्रिक टनांची घट झाली आहे.
नागपुरातून संत्री, औषधे, तांदूळ, विमानांचे सुटे भाग, अभियांत्रिकी उत्पादने तसेच अन्य माल एअर कार्गोच्या माध्यमातून पाठविला जातो. मात्र, एकूण प्रमाण अत्यल्प आहे, सध्या दरमहा साधारण ६०० ते ९०० मेट्रिक टन मालाचीच वाहतूक होत आहे. विशेष म्हणजे रायपूरमधून भाजीपाला आणि फळांची निर्यातही नागपूर विमानतळावरील कार्यों सुविधेच्या माध्यमातून केली जात आहे.
नागपूरचे भौगोलिक स्थान आणि उपलब्ध सुविधा रायपूरच्या कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. बाहेरील व्यापारी या सुविधेचा वापर करीत असताना स्थानिक उद्योजक मात्र अद्याप एअर कार्गोकडे वळलेले नाहीत.
Nagpur News : नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
नागपुरातून परदेशात जाणाऱ्या २ विमानसेवा उपलब्ध असून त्यातून कृषी आणि इतर उत्पादनांची वाहतूक करण्याची संधी आहे. मात्र, या सुविधेचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे १,५०,००० मेट्रिक टनांचे लक्ष्य गाठण्यासाठी विमानतळाची क्षमता नव्हे, तर तिचा प्रत्यक्ष वापर वाढविणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे.