Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime :गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण

Nagpur Crime : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी कारवाईमुळे विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई, गस्त आणि तपास यावर विशेष भर दिला. पोलिसांच्या या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होत आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 30, 2026 | 03:27 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • गुन्ह्यांतील घट
  • जीपीएस मुळे गस्तीवर थेट नजर
  • रस्ते अपघातांमध्ये ही घट
Nagpur Crime : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जुलैमध्ये मागील वर्षीच्या जुलैच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. खुनाच्या घटनांमध्ये ४१.४ टक्के, चोरीच्या घटनांमध्ये १७.३ टक्के, मारहाणीच्या घटनांमध्ये १८.१ टक्के तर विनयभंगाच्या घटनांमध्ये २०.५ टक्के घट झाली आहे. एकूण गुन्ह्यांमध्ये १८.५ टक्क्यांची घट नोंदवली आहे.

गंभीर आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. २०२६ मध्ये धोकादायक गुन्हेगार, अवैध शस्त्रे, अमली पदार्थ, वाहनचोरी, वाळूचोरी, गोवंश तस्करी आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या १२ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली. याशिवाय ग्रामीण पोलिसांनी २,३८५ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.

११६ बंधपत्र रद्द प्रकरणांमध्ये १० लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती कायद्यांतर्गत (एमपीडीए) १९ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.
नव्या कायद्यांचा प्रभावी वापर ग्रामीण पोलिसांनी संघटित आणि गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींवर कारवाई केली आहे. २८ ऑगस्टपर्यंत ११ गुन्हे दाखल केले.

Nagpur News : नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश

यात चोरी, अवैध पशुवाहतूक, दरोडा, अमली पदार्थ आणि प्रतिबंधित सगंधित तंबाखुशी संबंधित
गुन्ह्यांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२ अंतर्गत २०२४ ते २०२६ या कालावधीत एकूण ८१ गुन्हे दाखल केले. यामध्ये जुगार, अवैध मद्यविक्री आणि चोरीच्या प्रकरणांचा समावेश आहे.

गुन्ह्यांतील घट

गुन्हा 2025 2026 घट (टक्क्यात)
खून 29 17 41 . 4
चोरी 684 626 17 . 3
स्नैचिंग 7 4 42 . 9
मारहाण 614 503 18 . 1
विनयभंग 126 101 20 . 5
दंगल 20 16 20 . 0

जीपीएस मुळे गस्तीवर थेट नजर

नागपूर ग्रामीणमधील पोलिस ठाण्यांच्या वाहनांना जीपीएस प्रणालीशी जोडले आहे. या माध्यमातून पोलिस वाहनांवर थेट लक्ष ठेवले जात आहे. गस्तीच्या वाहनाचे ठिकाण, मार्ग, थांबे आणि कापलेले अंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे संवेदनशील तसेच गुन्हेप्रवण भागात पोलिस बंदोबस्ताचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य झाले आहे. घटनास्थळी तातडीने पोहोचण्याची पोलिसांची क्षमता वाढली आहे.

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम

रस्ते अपघातांमध्ये ही घट

राज्यात रस्ते अपघातांमध्ये घट जानेवारी ते जुलै या कालावधीत जिल्ह्यांमध्ये नोंदवणाऱ्या नागपूर ग्रामीणचा सलग पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. पोलिसांच्या रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजनांमुळे २०२६ मध्ये रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत २२ टक्के तर एकूण अपघातांमध्ये २३ टक्क्यांची घट झाली आहे.

Web Title: Nagpur crime nagpur rural police excel in crime control crime rates decline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Nagpur Crime News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News :नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश
1

Nagpur News :नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम
2

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम

Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले
3

Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले

Crime News : खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत
4

Crime News : खंडणी न दिल्याने रचला हत्येचा डाव; पोलिसांनाच धक्काबुक्की, दोघे अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.