फोटो सौजन्य AI
काही शाळांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. मात्र, कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांसह शाळा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. ३१ ऑगस्ट रोजी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित शाळांमध्ये विशेष खबरदारी घेतली. शाळांच्या परिसरासह वर्गखोल्या, आवार आणि आजूबाजूच्या परिसराची पोलिस अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासणी केली.
Nagpur Crime : गुन्हे नियंत्रणात नागपुर ग्रामीण पोलीस धुरंधर ; गुन्ह्यांच्या टक्क्यात घसरण
यापूर्वी १८ ऑगस्ट रोजीही शहरातील शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल पाठविण्यात आले होते. आभासी खासगी जाळ्याचा (व्हीपीएन) वापर करून पॅरिस आणि बांगलादेशातून हे ई-मेल पाठविण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे सोमवारी पुन्हा धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी कोणताही धोका पत्करला नाही.
Nagpur News : नासुप्र मुख्यालयात मनमानी पार्किंग ; पावती शिवाय आकारले जाते शुल्क
सोमवारी सकाळी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या होत्या. मात्र, धमकीची माहिती समोर आल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने काही शाळांनी सकाळी ९ ते १० वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना अचानक सुट्टी जाहीर केली. पालकांना संदेश पाठवून मुलांना शाळेतून घेऊन जाण्यास सांगण्यात आले.
अनेक पालक कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांना तातडीने व्यवस्था करून शाळेत धाव घ्यावी लागली, दरम्यान, शाळेच्या बस आणि वाहनचालकांपर्यंत सुट्टीची माहिती वेळेत न पोहोचल्याने काही विद्यार्थी पालक येईपर्यंत शाळेतच ताटकळले होते.
Nagpur News : २६ वर्षांचा वनवास; रिंगरोडसाठी घेतलेल्या जमिनीची भरपाई कधी?
३१ ऑगस्टच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवार रात्रीपासूनच संबंधित शाळांच्या परिसरातील गस्त वाढविली होती, स्थानिक पोलिस ठाण्यांना शाळा आणि आजूबाजूच्या परिसरात नियमित गस्त घालण्यासह संशयास्पद व्यक्तींची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रात्रीच्या वेळी शाळांसमोर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. शाळा किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी ती हाताळू नये, तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






