Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Nagpur Crime : नागपुरात नगरसेवकावरील गोळीबाराच्या प्रकरणाचा पोलिसांनी ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून छडा लावला. तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ७ संशयितांना जेरबंद केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 05, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • अंकुशवर ४६ तर रिषभ वर १४ गंभीर गुन्हे
  • गोळीबाराच्या १० तास आधी रचला कट
  • तपास पथकाला २५ हजार बक्षीस जाहीर
Nagpur Crime : काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार करून पसार झालेल्या ७ आरोपींना नागपूर पोलिसांनी गुजरात, छत्तीसगड आणि नागपूर येथून अटक केली. तब्बल ५०० सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांनी अंधुक तपासाचा छडा लावला. अंकुश तोमस्कर (३०), अमित ठाकरे (२२), ऋषभ ऊर्फ छोट्या नागदिवे (२४), रोमित ऊर्फ पुल्ल्या वाहने (२५), ऋषभऊर्फ कांचा पैथल (३०), केतन माटे (२४) आणि कार्तिक तोमस्कर (२४) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

अंकुश आणि अमित यांना छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून तर ऋषभ ऊर्फ कांचा आणि रोमित यांना गुजरातमधील सूरत येथून अटक केली. अन्य तिघांना नागपुरातून ताब्यात घेतले. आरोपींकडून ८ मोबाईल आणि गोळीबारात वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहेत. गोळीबारामागील मुख्य सूत्रधार आणि महिला साथीदाराचा शोध सुरू आहे.

Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा

त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.२६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.४२ वाजता नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. मागे बसलेल्या व्यक्तीने घराच्या दिशेने गोळीबार केल्याचे फुटेजमध्ये आढळले.

जरिपटका परिसरातील अंगुलीमालनगर येथील सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींच्या हालचाली,संपर्क आणि संभाव्य ठिकाणांचा माग काढला. कृत्रिम बुद्धिमत्तेनेही विविध सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले.

अंकुशवर ४६ तर रिषभ वर १४ गंभीर गुन्हे

गोळीबारानंतर ऋषभ आणि रोमित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले होते. अंकुश आणि अमित यांनी राजनांदगाव येथील हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. अंकुशविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे ४६ गुन्हे दाखल आहेत तर ऋषभविरुद्ध १४ गुन्हह्यांची नोंद आहेत .

CSMT Sawantwadi Express: चला, कोकण आपलाच असा…! गणेशोत्सवात कोकणवासीयांना रेल्वेची भेट; CSMT-सावंतवाडी एक्स्प्रेसचा आज शुभारंभ

गोळीबाराच्या १० तास आधी रचला कट

सुमारे १० तास आधी आरोपींची बैठक झाल्याचे समोर आले आहे. बैठकीत गोळीबाराची योजना आखली. मुख्य सूत्रधाराने अमित ठाकरे याला गोळीबाराची माहिती दिली होती. अमितने इतर आरोपींना पैसे, पिस्तूल आणि वाहन उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेच्या वेळी ऋषभ नागदिवे दुचाकी चालवत होता तर अंकुश तोमस्कर मागे बसला होता. अंकुशनेच मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळी झाडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

तपास पथकाला २५ हजार बक्षीस जाहीर

विविध पथकांच्या समन्वयातून गुजरात आणि छत्तीसगडपर्यंत तपासाची सूत्रे नेऊन ७ आरोपींना अटक केली. उल्लेखनीय कामगिरीबद्दल तपास पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याच्या दृष्टीनेही पोलिसांकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तानी दिली.

Web Title: Nagpur crime thrilling shootout case cracked using 500 cameras 7 arrested for attack on corporator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Attack
  • Crime in Nagpur
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा
1

Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…
2

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत
3

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले
4

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.