Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Nagpur News : मध्य रेल्वेने २०२६-२७च्या पहिल्या सहामाहीत ३२३.५० कोटी रुपयांची विक्रमी भंगार विक्री करत भारतीय रेल्वेत अव्वल स्थान मिळवले. नागपूर विभागाचा यात ४६.०८ कोटी रुपयांचा वाटा आहे. ई-कचरा, जुने रूळ, लोकोमोटिव्ह, डबे आणि वॅगन्सची विल्हेवाट लावत रेल्वेने महसुलासोबतच मौल्यवान जागाही मोकळी केली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 05, 2026 | 03:34 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबरमध्ये विक्रमी ७०.४२ कोटींची भंगार विक्री
  • नागपूरचा ४६.०८ कोटींचा वाटा
  • ई-कचऱ्यासह रेल्वे साहित्याचीही विल्हेवाट
Nagpur News :मध्य रेल्वेने ‘झिरो स्क्रॅप मिशन’ अंतर्गत भंगार विल्हेवाटीत मोठी कामगिरी करत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत मध्य रेल्वेने तब्बल ३२३.५० कोटी रुपयांच्या भंगार विक्रीची नोंद केली.

विशेष म्हणजे नागपूर विभागानेही या कामगिरीत ४६.०८ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. भंगार विक्रीसोबतच रेल्वेच्या जागेचा प्रभावी वापर, स्वच्छता आणि अनावश्यक साहित्याची विल्हेवाट यावरही मध्य रेल्वेने भर दिला आहे.

Nagpur News : ’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान

सप्टेंबरमध्ये विक्रमी ७०.४२ कोटींची भंगार विक्री

मध्य रेल्वेसाठी सप्टेंबर २०२६ हा विशेष ठरला. या एका महिन्यात तब्बल ७०.४२ कोटी रुपयांचे भंगार विकण्यात आले, जो मध्य रेल्वेचा एका महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रीचा विक्रम आहे. ‘स्वच्छता हीच सेवा पंधरवडा’दरम्यान भांडार विभागाने विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेत ४,८८४ मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली आणि त्यातून ४४.२४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यामुळे रेल्वेच्या विविध ठिकाणी पडून असलेल्या निरुपयोगी साहित्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागला.

नागपूरचा ४६.०८ कोटींचा वाटा

मध्य रेल्वेच्या एकूण ३२३.५० कोटी रुपयांच्या भंगार विक्रीत विविध विभागांनी महत्त्वाचे योगदान दिले. भुसावळ विभागाने ५७.२७ कोटी रुपयांसह सर्वाधिक योगदान दिले. त्यानंतर मुंबई विभागाने ५२.०८ कोटी, पुणे विभागाने ४७.५५ कोटी, तर नागपूर विभागाने ४६.०८ कोटी रुपयांचे योगदान दिले. सोलापूर विभागाचा वाटा १४.६९ कोटी रुपये राहिला. त्यामुळे नागपूर विभागानेही या विक्रमी कामगिरीत आपली भक्कम भूमिका बजावली आहे.

Nagpur News : सीताबर्डीत नासुप्रच्या व्यापार संकुलाचे झाले खंडर

ई-कचऱ्यासह रेल्वे साहित्याचीही विल्हेवाट

भंगार विक्रीपुरते हे अभियान मर्यादित राहिलेले नाही. मध्य रेल्वेने १.११ कोटी रुपयांच्या ४६.८५ मेट्रिक टन निरुपयोगी ई-कचऱ्याची ही यशस्वी विल्हेवाट लावली. सहा महिन्यांत २९,९९३ मेट्रिक टन रेल्वे रूळ व संबंधित साहित्य, २३ लोकोमोटिव्ह, ६२ डबे आणि ७० वॅगन्सची विल्हेवाट करण्यात आली.

या प्रक्रियेमुळे यार्ड, कार्यशाळा आणि रेल्वेमार्गालगतची मौल्यवान जमीन मोकळी झाली. त्यामुळे ‘झिरो स्क्रॅप मिशन’मधून रेल्वेला महसूल मिळण्यासोबतच स्वच्छता, जागेचा योग्य वापर आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापनालाही चालना मिळाली आहे.

Web Title: Nagpur news 324 crore earned from scrap sales central railway tops indian railwayscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Railway News

संबंधित बातम्या

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
1

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
3

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान
4

Nagpur News :’गड’ परत आणण्याचे कोहळेंसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.