
फोटो सौजन्य AI
नंदनवन पोलिस ठाण्यात दीपक मधुकर चिमंत्रवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीला बी.टेक. (एआय) प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी १ लाख ३० हजार रुपये घेतले. प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुलीची मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर बारावीच्या मूळ हस्तांतरण प्रमाणपत्राची कथित बनावट प्रत तयार केली.
ही बनावट प्रत सामायिक प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर सादर करून अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मात्र, दुसऱ्या वर्षांच्या प्रवेशावेळी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी हस्तांतरण प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द केला.
Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
प्राथमिक तपासात विविध अभियांत्रिकी संस्थांमध्ये सल्लागार, मध्यस्थ आणि महाविद्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अशाप्रकारे गैरप्रकार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे आणखी किती विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवून दिला, याचा शोध घेतला जात आहे.
दोन्ही प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. नंदनवन प्रकरणात पंकज दहरवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. वृषभ धोटे, शीतल धरी, शुभम निंबाळकर यांच्यासह अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकारामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, तसेच त्यात कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही तक्रारदार गजानन सोपान खर्चे यांच्या तक्रारीनुसार, मुलाला बी.टेक. (एआय) अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी २ लाख ५० हजार रुपये घेतले. या प्रकरणातही बारावीचे हस्तांतरण प्रमाणपत्र कथितरीत्या बनावट तयार करून प्रवेश प्रक्रियेत वापरले. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर बनावटपणा उघडकीस आला आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला.
Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा
आधीच्या सरकारमध्ये शिक्षणात भ्रष्टाचार न्हवता असे नाही , पेपर फुटत न्हवते असे नाही पण आत्ताचे सरकार आल्यावर सुद्धा याच्यात काही फरक दिसतोय असेही होत नाहीत . किंबहुना आत्ता जास्तीच जोर वाढल्याचे दिसत आहे . शिक्षणाचा पूर्णपणे व्यापार झाल्याची , शिक्षण गरिबांच्या खिशाला परवडत नाहीत अशा भावना सामान्य नागरिकांच्या झाल्याचे विश्लेषक सांगतात .
ज्या देशाने शिक्षणाला त्याच्या व्यवस्थेला हलक्यात घेतले कि त्याची अधोगती ही निश्चित असते . शिक्षण सोडून इतर कुठेही भरकटणारे देश आणि त्यांची अवस्था काय झाली आहे . हे जगभरात नीट पाहिल्यावर आपल्याला समजते आहे .