Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत

Nagpur Crime :नागपुरात शेतकऱ्याच्या नावावर तब्बल ७४ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी टोळीतील एका आरोपीला नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 04, 2026 | 04:38 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • बनावट कंपन्यांमध्ये वळवला पैसा
  • बनावट वेअरहाऊस आणि लायसन्सचा खेळ
  • अनेक राज्यात पसरले आहेत धागेदोरे
Nagpur Crime – गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी १० हजारांची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर भारतीय स्टेट बँकेकडून ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कृषी कर्ज उचलले, बनावट कागदपत्रे आणि कंपन्या तयार करून करोडो रुपये हडपणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला नागपूर ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नागपूर रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे.

आरोपीची ओळख सचिन खुशाल कारेमोरे (४०, रा. नेरी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा) अशी पटली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश कामाले आणि पथकाने केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना सांगण्यात यायचे की पिकांच्या नुकसानीची सरकारी भरपाई म्हणून दरवर्षी १० हजार रुपये मिळतील आणि त्यासाठी एसबीआयमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. या बहाण्याने शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ७/१२ उतारे घेतले जायचे.

आरोप आहे की त्यांच्या नावावर लाखोंचे कृषी कर्ज उचलले जायचे. पोलिस तपासात समोर आले आहे की एसबीआयच्या मौदा शाखेतून ५४ कोटी ६९ लाख ४२ हजार ८५० रुपये तसेच रामटेक शाखेतून १९ कोटी १३ लाख ५० हजारांचे कृषी कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर उचलले गेले. अशाप्रकारे दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण ७३ कोटी ८२ लाख ९२ हजार ८५० रुपयांचे कर्ज काढले.

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले

बनावट कंपन्यांमध्ये वळवला पैसा

पोलिसांच्या माहितीनुसार, टोळीने कथितरीत्या बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम या कंपन्यांमध्ये वळवून काढून घेतली. मौदा आणि रामटेक पोलिस ठाण्यांमध्ये आतापर्यंत या प्रकरणात एकूण १६ आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

बनावट वेअरहाऊस आणि लायसन्सचा खेळ

प्रकरणाचे धागेधीरे आंतरराज्यीय स्तरापर्यंत जोडलेले असल्याची माहिती समोर आली आहे. टोळीचे सदस्य केंद्रीय प्राधिकरणाकडून वैअरहाऊसिंग डेव्हलपमेंट अॅड रेग्युलेटरी अथॉरिटी, दिल्ली वेचून कथितरीत्या बनावट वेअरहाऊस लायसन्स मिळवायचे. एसबीआयमध्ये बनावट इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वैअरहाऊस पावती गहाण ठेवून ‘प्रोड्यूस मार्केटिंग लोन’ योजनेतर्गत शेतक-यांच्या नावावर करोड़ों रुपयांचे कर्ज उचलले जायचे.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

अनेक राज्यात पसरले आहेत धागेदोरे

पोलीस तपासात बहुतांश आरोपी वेगवेगळ्या राज्यांतील असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेला आरोपी सचिन कारेमोरे याच्याविरुद्ध यापूर्वी भंडारा, गडचिरोली आणि अहेरी येथे धान घोटाळ्याशी संबंधित गुन्हेही दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तो गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या तावडीतून बाहेर होता. नुकताच नागपूर उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

 

Web Title: Nagpur crime 74 crore loan fraud in farmers name interstate gang member arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Loan Issue
  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले
1

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
2

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव
3

Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
4

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.