Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: २० रुपये मागितले… आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून निघताना नैतिकने आईकडे फक्त २० रुपये मागितले होते... आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो काहीही न बोलता घराबाहेर पडला. मात्र, काही वेळाने तो शेतात गंभीर अवस्थेत आढळला आणि रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 03:13 PM
Crime News: २० रुपये मागितले... आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

Crime News: २० रुपये मागितले... आईने नकार दिला; शाळेच्या वाटेवर निघालेल्या नैतिकचा धक्कादायक अंत

Follow Us
Follow Us:
  • २० रुपये न मिळाल्याने नाराज झालेला आठवीतील नैतिक शेतात आढळला
  • रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले
  • मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट; देवलापार पोलिसांचा तपास सुरू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पथरई येथे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शेतात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नैतिक हा नवजीवन विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. मंगळवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने तो शेतात आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, नैतिकचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे नैतिक शाळेत जाण्यासाठी तयार झाला. घराबाहेर पडताना त्याने आईकडे २० रुपये मागितले. मात्र हे पैसे कशासाठी हवेत, अशी विचारणा आईने केली असता त्याने कारण सांगितले नाही. त्यामुळे आईने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर नैतिक नाराज होऊन काहीही न बोलता घरातून शाळेच्या दिशेने निघून गेला. मात्र काही वेळाने तो शेतात गंभीर अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा : लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

नेमके कारण काय?

२० रुपये न मिळाल्याने नैतिक नाराज झाला होता. त्याच कारणातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नैतिकच्या मृत्यूमागे नेमके कारण काय होते, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Nagpur class 8 student death deolapar pathrai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Nagpur Case
  • Nagpur News
  • School Students

संबंधित बातम्या

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…
1

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ
2

Gadchiroli News: ‘घरी जायचंय’ म्हणाली अन् काही तासांतच मृत्यू; आश्रमशाळेतील घटनेने खळबळ

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा
3

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातील व्यावसायिकाच्या मृत्यूला नवे वळण; शरीराच्या मागील बाजूस ९० टक्के जखमा

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या
4

Sindhudurg Crime News: दोन दिवस बेपत्ता, जंगलात मृतदेह; महिला हवालदाराच्या पतीला अखेर बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.