Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : नागपुरात डीजे बंदीचा कडकडाट; आदेशावरून वातावरण तापले

Nagpur News : नागपुरात डीजे आणि उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमवर पोलिसांनी बंदी घातल्याने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे डीजे व्यावसायिक आणि आयोजकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, बंदीच्या आदेशावरून चर्चा आणि विरोधाचे सूर उमटत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 04, 2026 | 03:55 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • चळवळ धर्माच्या उत्सवाच्या विरोधात नाही
  • मध्यम मार्ग काढा DJ व्यवसाय
  • हे आम्ही खपवून घेणार नाही
  • DJ वाजवणारच – विश्व हिंदू परिषद
Nagpur News – डीजेवर बंदी घालावी की नको, यावरून भाजपच्या आजी-माजी आमदारांत जोरदार घमासान सुरू झाले आहे. नागपुरात डीजे बंदीवरून आजी-माजी आमदारांसह, विश्व हिंदू परिषदही आक्रमक झाली आहे. आनंदाच्या नावाखाली होणारा कर्णकर्कश डीजे, ध्वनिप्रदूषण आणि लेजर लाईटचा अतिरेक थांबला पाहिजे, अशी भूमिका घेत भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी लोकचळवळ उभारली आहे.

तर हिंदू सणांच्या तोंडावरच डीजेवर बंदी का, असा सवाल भाजपचेच विद्यमान आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. तिकडे विश्व हिंदू परिषदेनेही डीजे बंदीला विरोध केला आहे. विहिंप म्हणते की काहीही होवो, आम्ही आमच्या सणांना डीजे वाजवणारच. तर या बंदीने डीजे व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळणार आहे.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात DJ-लेझरला ‘नो एन्ट्री’! विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय; नियम मोडल्यास थेट कारवाई

चळवळ धर्माच्या उत्सवाच्या विरोधात नाही

डीजेवरील बंदीसाठी व्यापक जनचळवळ उभारली असून, चळवळीचा पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन पेटिशनद्वारे नागरिकांचा सहभाग नोंदवण्यात येत आहे. ही चळवळ कोणत्याही धर्माच्या, उत्सवाच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. मात्र, एकाच्या किंवा समूहाच्या आनंदासाठी दुसऱ्यांच्या आरोग्याशी आणि शांततेशी तडजोड होऊ नये. त्यासाठी टप्प्याटप्प्याने चळवळ चालवली जाणार आहे, असे संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

मध्यम मार्ग काढा DJ व्यवसाय

आम्ही अनेक गणेश, दुर्गादेवी मंडळांकडून अग्रीम रक्कम घेऊन लाखोंचे साहित्य विकत घेतले आणि अचानक बंदी आणली तर आम्ही बरबाद होऊन जाऊ, असे डीजे-साऊंड सिस्टीम संघटनेचे म्हणाणे आहे. कारण, एका डीजे व्यावसायिकावर ३००-४०० लोक अवलंबून असतात. काम करणारी मुले, मेस वाल्या महिला, ट्रान्सपोर्टच्या गाड्या, डेकोरेशन, जनरेटर आदी व्यवसाय अवलंबून असतात.

डीजेवर बंदी आणणे, हा उपाय नाही तर यातून मध्यम मार्ग काढला पाहीजे, अशी भूमिका डीजे आणि साऊंड सिस्टम व्यावसायिक रविकांत पवनीपगार, नंदन गजेंद्रगडेकर, कमलेश भांडेकर, स्वप्निल सुले, किरण घाडोले आणि निखिल कामडे यांनी मांडली.

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

हे आम्ही खपवून घेणार नाही

डीजे बंदीच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशावर आमदार प्रवीण दटके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बंदीला आमचा विरोध नाही, मात्र, हा आदेश फक्त हिंदूंच्या सणांच्या आधीच का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतर जाती-धर्माच्या सणांच्या वेळी असा आदेश का काढला गेला नाही, असा थेट सवाल त्यांनी पोलिस प्रशासनाला केला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलिस आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी आमदार दटकेंनी केली आहे.

DJ वाजवणारच – विश्व हिंदू परिषद

ईदपूर्वी डीजे बंदी करा, अशी मागणी पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना आम्ही केली होती. त्यावेळी कोणतीही पावले उचलली नाही. आता हिंदू सणांपूर्वीच डीजे बंदी केली. याला आमचा विरोध आहे, असे विश्व हिंदू परिषद नागपूरचे मंत्री अमोल ठाकरे यांनी म्हटले आहे. गुन्हे दाखल झाले तरी चालेल, पण सहा तारखेला जन्माष्टमीला शोभायात्रेत डीजे वाजवणारच, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Web Title: Nagpur news strict crackdown on djs in nagpur order sparks heated atmosphere

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Nagpur Police
  • Nagpur Police Commissioner

संबंधित बातम्या

Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव
1

Nagpur Suicide Case : मृत्यूच्या दारातून परतला तरुण; ११२ वर कॉल येताच पोलिसांची धाव

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह
2

Nagpur News : मताधिक्यापेक्षा चौपट मतदार गायब; मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच SIR वर प्रश्नचिन्ह

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
3

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
4

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.