
फोटो सौजन्य AI
खापरखेडा मुख्य बाजारातील चिकन मार्केटजवळ ही बाब लक्षात येताच काही विक्रेत्यांनी प्रसंगावधान राखून व्हॅन थांबवली. पाण्याचा मारा करून टायरला लागलेली आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
Nagpur News : नागपूरच्या शिरपेचात मनाचा तुरा ;वंडरगर्ल दिव्याला अर्जुन पुरस्कार जाहीर!
मंगळवारी दुपारी एबी इनक्लाइनच्या मेन मॅगझिनमधून विस्फोटक घेऊन व्हॅन शिंगोरी आणि भानेगाव येथील कोळसा खाणींकडे निघाली होती. याचवेळी व्हॅनच्या एका टायरमधून धूर निघत असल्याचे शफीक अन्सारी, अक्रम कुरेशी, तौशिफ फजलानी यांच्यासह अन्य चिकन विक्रेत्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकाला सांगून व्हॅन थांबवली. त्यानंतर पाण्याचा मारा करून टायरला लागलेली आग नियंत्रणात आणली.
Nagpur News : बोगस डॉक्टारांविरोधात मनपाची धडक मोहीम !विशेष पथके सक्रिय
गंभीर बाब म्हणजे संबंधित एक्सप्लोसिव्ह व्हॅनचा विमा मे २०२६ मध्येच संपल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विमा संपलेले आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसलेले वाहन तब्बल ३ ते ६ टन स्फोटक सामग्री घेऊन रस्त्यावर कसे धावत होते .
असा प्रश्न उपस्थित होत आहे. मेन मॅगझिन ते खापरखेडा-भानेगाव हा सुमारे १५ किलोमीटरचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर चनकापूर, खापरखेडा आणि भानेगावसारखे दाट लोकवस्तीचे भाग आहेत. त्याचबरोबर दोन मोठे औष्णिक वीज प्रकल्पही या परिसरात आहेत. त्यामुळे छोटीशी चूकही मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते.
कोळसा खाणींमधून लाखो टन कोळसा काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ६ टन स्फोटकांचा या मार्गावर अपघात झाला असता, तर जीवित आणि वित्तहानी किती मोठ्या प्रमाणावर झाली असती, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. स्फोटकांच्या वाहतुकीसाठी पेट्रोलियम अॅड एक्सप्लोसिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून कठोर सुरक्षा नियम निश्चित करण्यात आले आहेत.