Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर

Nagpur News: एका बाजूला राज्यात दुष्काळ असताना शहरात आता पाणीटंचाई चे संकट निर्माण झाले आहे . नागपुरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त; पाणीपुरवठ्याच्या समस्येवरून मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 09, 2026 | 04:19 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पाणीपुरवठा विभागात जबाबदारीचा खेळ
  • विश्व बँक प्रकल्पामुळे वेळेत काम पूर्ण नाही
  • आचारसंहितेपेक्षा पाणी महत्त्वाचे नाही का?
Nagpur News:दुरुस्ती आणि देखभालीच्या नावाखाली वारंवार घेतल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा शटडाऊनचा फटका थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाला बसू लागला आहे. ६ ऑक्टोबरला शहरातील काही भागांत ३६ तास तर काही भागांत १२ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवला. मात्र, शटडाऊनचा कालावधी संपून तब्बल ७२ तास उलटूनही अनेक भागांत नळ कोरडेच राहिले.

परिणामी शहरातील विविध भागांत पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याबाबतही नागरिकांना स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे जलसंकटाच्या या परिस्थितीत मनपा प्रशासन नेमके कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाणीपुरवठा विभागात जबाबदारीचा खेळ

शहराची जलवितरण व्यवस्था खासगी कंपनीकडे सोपवल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाची भूमिका नेमकी काय, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर नागरिकांना त्याची कारणे आणि पाणी कधी सुरू होणार, याची माहिती मिळणणे अपेक्षित आहे, मात्र, संबंधित अधिकाऱ्याकडून समाधानकारक माहिती दिली जात नसल्याचे चित्र आहे.

एखाद्या अधिकाऱ्याकडे विचारणा केल्यास अधिकार दुसऱ्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे असल्याचे सांगितले जाते. त्या अधिका-यांकडे गेल्यास कार्यकारी अभियंत्याकडे पाठविले जाते. एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्याऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे या प्रकारातून दिसून येते.

Niti Aayog : नीती आयोगाच्या क्रमवारीत गडचिरोली देशात अव्वल; ‘या’ गोष्टीत आगेकूच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

विश्व बँक प्रकल्पामुळे वेळेत काम पूर्ण नाही

पैच-४ जलशुद्धीकरण केंद्रातील पाईपलाईन स्थलांतराच्या कामासाठी बंद केलेला जलपुरवठा निर्धारित ३६ तासांनंतरही पूर्ववत होऊ शकला नाही. विश्व बैंक प्रकल्पांतर्गत करण्यात येणारे काम वेळेत पूर्ण न झाल्याने जलपुरवठा बंद ठेवण्याचा कालावधी वाढवावा लागला. त्यामुळे शहरातील प्रभावित भागांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

मनपाकडून शुक्रवारपासून टप्याटप्याने जलपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. महापौर नीता ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देऊन लवकरात लवकर जलपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा उपमहापौर लीला हाथीबेड यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

आचारसंहितेपेक्षा पाणी महत्त्वाचे नाही का?

आचारसंहितेमुळे शहरातील अतिआवश्यक कामावर कोणतीही बंदी नसते. मग हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे यापेक्षा महत्त्वाचे काम कोणते, असा सवाल उपस्थित होत आहे. मनपा प्रशासनाने पदाधिका-यांच्या निर्देशांची वाट पाहण्याऐवजी आपत्कालीन परिस्थितीत स्वत हुन निर्णय घेणे गरजेचे आहे.

मात्र, शहरात अचानक निर्माण होणाऱ्या समस्यांवरही अधिकारी स्वतः हुन पुढाकार घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गुरुवारी अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः देवाच्या भरवशावर राहावे लागले.

 

Web Title: Nagpur news water crisis causes havoc nmc remains indifferentcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
1

Nagpur Police :डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
2

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई
3

Raigad News: पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! जय भारत नाक्यावरील अडथळे हटवले, आयुक्त मंगेश चितळे यांची कारवाई

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!
4

Solapur News: तेलंगणाहून नाणीजधामकडे निघाली ‘वसुधरा दिंडी’; सोलापुरात भाविकांचे भव्य स्वागत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.