Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

एकट्या महिलांना हेरायचे, दागिने-पर्स हिसकावून पसार व्हायचे आणि चोरीचा माल थेट विकण्याऐवजी त्यातून पैसे उभे करायचे... नागपुरातील या चोरीच्या मालिकेचा पोलिसांनी छडा लावला आहे. हर्ष ऊर्फ एक्का रामटेकेच्या अटकेनंतर सहा गुन्हे उघडकीस आले असून, ७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 24, 2026 | 04:38 PM
Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

Follow Us
Follow Us:
  • ७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • चोरीचे दागिने गहाण ठेवून चार लाखांचे गोल्ड लोन
  • दुचाकी आणि मोबाईल चोरीचाही उलगडा

नागपूर : शहरातील दिघोरी, हुडकेश्वर आणि सक्करदरा परिसरात एकट्या-दुकट्या महिलांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने आणि पर्स लुटणाऱ्या हर्ष ऊर्फ एक्का महेंद्र रामटेके (वय २५, रा. तिरोडा, जि. गोंदिया) याला पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या अटकेनंतर चोरी, वाहनचोरी आणि अपहरणासह सहा गंभीर गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी सुमारे ७ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महिलांना हेरून लुटमार

दिघोरी, हुडकेश्वर आणि सक्करदरा परिसरात एकट्या महिलांना हेरून रामटेके दागिने व पैसे लुटत असल्याचे तपासात समोर आले. या घटनांनंतर पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा: Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा

दागिने गहाण ठेवून चार लाखांची उचल

सक्करदरा परिसरातील एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्यानंतर आरोपीने ते थेट बाजारात विकण्याऐवजी गोल्ड लोनसाठी वापरले. उमरेड येथील मित्राच्या आधारकार्डचा वापर करून त्याने खासगी गोल्ड लोन बँकेत दागिने गहाण ठेवले. त्यातून मिळालेले चार लाख रुपये खात्यात जमा करून घेतल्यानंतर ऑनलाइन यूपीआयच्या माध्यमातून ते स्वतःच्या खात्यात वळते केल्याचे तपासात समोर आले.

दोन दुचाकी चोरी

६ सप्टेंबर रोजी रामटेकेने नागपुरातून दुचाकी चोरी केली आणि तुमसर गाठले. तेथे पेट्रोल संपल्याने त्याने ती दुचाकी सोडून दिली. त्यानंतर दुसरी दुचाकी चोरी करून तो पुन्हा नागपूरला आला. वाहनचोरीच्या या घटनांचाही तपासात उलगडा झाला आहे.

हेही वाचा: Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

काही तासांत तीन महिलांना लक्ष्य

१२ सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासांच्या अंतरात आरोपीने हुडकेश्वर आणि सक्करदरा परिसरातील तीन महिलांना लक्ष्य केले. त्यांच्या पर्स आणि दागिने हिसकावून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेला मोबाईल विकण्यासाठी त्याने नंदनवन परिसरातील एका परिचित महिलेची मदत घेतल्याचेही समोर आले आहे.

सहा गुन्ह्यांचा छडा

रामटेकेच्या अटकेनंतर चोरी, वाहनचोरी आणि अपहरणासह सहा गुन्ह्यांचा छडा लागला आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Nagpur women gold chain theft accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Crime in Nagpur
  • Gold Jewellery
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा
1

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
2

Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?
3

Beed Crime: बिंदुसरा नदीपात्रात तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह; पुलावरून फेकले की नदीत नेऊन ठेवले?

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
4

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.