Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही ३ अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळले. एक व्यक्ती सक्करदरा चौक फ्लायओव्हरखाली, दुसरा मोठा ताजबाग लंगरखान्याच्या भिंतीजवळ आणि तिसरा मोठा ताजबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे आढळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2026 | 09:35 AM
उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच उष्णतेने जनजीवन विस्कळीत होत आहे. बुधवारी शहरासह नागपूर रेल्वे स्थानक आणि विविध गाड्यांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये शहर हद्दीत ५, स्थानकावर २ तर ३ प्रवाशांचा मृत्यू गाड्यांच्या आत झाला.

प्राथमिक माहितीनुसार, उष्माघात या मृत्यूंचे संभाव्य कारण मानले जात आहे. सर्व प्रकरणांमध्ये शहर पोलिस आणि लोहमार्ग पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी सुमारे १.१५ वाजता कृष्णा भोजनालयासमोरील फ्लायओव्हरखाली एका खांबाजवळ सुमारे ६५ वर्षीय अज्ञात व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली. त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

Heat Stroke : वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही क्षणी हिट स्ट्रोकने जाईल जीव, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी अशी घ्या काळजी

दुसऱ्या घटनेत सुमारे ५० वर्षीय व्यक्ती कळमना फळबाजारात बेशुद्धावस्थेत आढळला. त्यालाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही ३ अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळले. एक व्यक्ती सक्करदरा चौक फ्लायओव्हरखाली, दुसरा मोठा ताजबाग लंगरखान्याच्या भिंतीजवळ आणि तिसरा मोठा ताजबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे आढळला. तिघांनाही मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले, या तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्लॅटफॉर्मवर आढळले २ मृतदेह

दरम्यान, बुधवारी सकाळी ११.४० च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आलेल्या ट्रेन क्रमांक २२६९२ निजामुद्दीन-बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसच्या गार्ड बोगीसमोर सुमारे ४० वर्षीय अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळली. त्यानंतर दुपारी १२.४८ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या इटारसी टोकावरील नव्या वेटिंग हॉलजवळ सुमारे ७० वर्षीय अन्य एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह सापडला.

गाड्यांमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू

दुपारी २.३५ वाजता नागपूर स्थानकावर आलेल्या ट्रेन क्रमांक १५२९३ चारलपल्ली अमृत भारत एक्सप्रेसच्या जनरल डब्यात प्रवासी मुसरिका रोनामा (वय ६०) यांची प्रकृती बिघडल्यानंतर मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी ३.१२ वाजता ट्रेन क्रमांक १२६२१ चेन्नई सेंट्रल-नवी दिल्ली तमिळनाडू एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये प्रवासी मेहरबान केवट (वय ३४) मृतावस्थेत आढळले. तर सायंकाळी ७.३७ वाजता ट्रेन क्रमांक १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्सप्रेसच्या एस-२ कोचमध्येही एका प्रवाशाच्या मृत्यूची माहिती समोर आली.

भीषण उष्णता आणि गर्दी ठरली जीवघेणी

रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, गाड्यांमधील प्रचंड उष्णता आणि सामान्य डब्यांतील अतिगदर्दीमुळे प्रवाशांची प्रकृती सतत बिघडत आहे. अनेक कोचमध्ये पुरेशा वायुवीजनाची व्यवस्था नसल्याने आतील तापमान अधिक जाणवत आहे. रेल्वेकडून या मृत्यूंचे कारण आजारपण सांगितले जात असले, तरी प्रथमदर्शनी उष्माघाताची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. जीआरपीने आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Web Title: Risk of heatstroke is rising 10 deaths reported in a single day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • heat wave
  • Nagpur News

संबंधित बातम्या

मित्रांसोबत पोहणे बेतले जीवावर; डोहात पोहत असताना तरुणाचा पाय घसरला अन् बुडून मृत्यू झाला
1

मित्रांसोबत पोहणे बेतले जीवावर; डोहात पोहत असताना तरुणाचा पाय घसरला अन् बुडून मृत्यू झाला

धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…
2

धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.