Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपकडून माढ्यात नाईक निंबाळकरांना उमेदवारी; मोहिते पाटील काय भूमिका घेणार?

माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे, परंतु आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2024 | 12:32 PM
भाजपकडून माढ्यात नाईक निंबाळकरांना उमेदवारी; मोहिते पाटील काय भूमिका घेणार?
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्याच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे, परंतु आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील परिवार अतिशय आक्रमक दिसून आला. ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन धर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले.

२०१९च्या निवडणुकीत आमदार संजय शिंदे यांनी मोहिते पाटील भाजपत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी मोहिते पाटील गटाने भाजपला दिलेल्या शब्दांनुसार माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तब्बल एक लाख १३ हजार इतके मताधिक्य दिले होते. त्या जाेरावर नाईक निंबाळक निवडून आले. बदलत्या परिस्थितीत आमदार शिंदे व नाईक निंबाळकर यांच्यात जवळीक तर माेहिते-पाटील व नाईक निंबाळकर यांच्यात दुरावा निर्माण झाला.

नाईक निंबाळकर यांचे तिकिट कापून माेहिते पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा हाेती. मात्र पुन्हा उमेदवारी मिळाल्याने धैर्यशील माेहिते पाटील काेणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहिते पाटील गटासमाेर मोठा पेच

कार्यकर्त्यांनी यंदा धैर्यशील मोहिते पाटील हेच आपले खासदार असतील अशी बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. यंदा काही करून लोकसभेची उमेदवारी मिळवायचीच अशा भूमिकेत मोहिते पाटील परिवार होता. परंतु आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

Web Title: Naik nimbalkar nominated by bjp in madha what role will mohite patil play nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 12:32 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Madha Lok Sabha
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी
1

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

Congress Politics : कॉंग्रेसमध्ये विचारधारेचे द्वंद्व! सुरुवातीपासूनच राहिला असंतोष अन् भांडण
2

Congress Politics : कॉंग्रेसमध्ये विचारधारेचे द्वंद्व! सुरुवातीपासूनच राहिला असंतोष अन् भांडण

VB-G RAM-G Bill passed : लोकसभा आहे की कुस्तीचा आखाडा? VB-G RAM-G बिल पास होताच खासदारांनी केली फेकाफेकी
3

VB-G RAM-G Bill passed : लोकसभा आहे की कुस्तीचा आखाडा? VB-G RAM-G बिल पास होताच खासदारांनी केली फेकाफेकी

Pradnya Satav joins BJP : काँग्रेसच्या पाठीत खुपसला खंजीर? प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राजीव सातवांच्या पत्नीचा भाजप प्रवेश
4

Pradnya Satav joins BJP : काँग्रेसच्या पाठीत खुपसला खंजीर? प्रामाणिकपणाचे प्रतीक असलेल्या राजीव सातवांच्या पत्नीचा भाजप प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.