Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीड व परभणी प्रकरणावरुन नाना पटोले आक्रमक; म्हणाले, आता सरकारला…

सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 17, 2024 | 04:50 PM
बीड व परभणी प्रकरणावरुन नाना पटोले आक्रमक; म्हणाले, आता सरकारला...

बीड व परभणी प्रकरणावरुन नाना पटोले आक्रमक; म्हणाले, आता सरकारला...

Follow Us
Follow Us:

नागपूर : ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणी सरकारविरोधात विधान भवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुन्यांना अटक करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खुन्यांना संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

सभागृहाचे कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी परभणीतील पोलीस अत्याचाराचा व दलित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी नाना पटोले म्हणाले की, आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी परभणीत जे कोंबिग ऑपरेशन केले ते शासन निर्मित होते का, यासह या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे त्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला आहे. या विषयावर बुधवारी चर्चा करु, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी; येरवडा कारागृहात नेमकं काय घडलं?

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या ईव्हीएम विधानसभेला वापरल्या नाहीत, त्यासाठी गुजरातमधून ईव्हीएम मागवण्यात आल्या. ईव्हीएमचा दुरुपयोग केला जात आहे. ईव्हीएम मशीन बनवण्याच्या कंपनीत भाजपाचे लोक संचालक मंडळावर आहेत. निवडणूक आयोगाला असलेले संवैधानिक अधिकाराचा वापरही ते करू शकत नाहीत सर्व कारभार भाजपाच्या इशाऱ्यावर सुरु आहे यातून भाजपाची मानसिकता स्पष्ट होते. लोकशाही व्यवस्था संपवण्याची आरएसएसची जी मानसिकता आहे त्यासाठीच वन नेशन नो इलेक्शन विधेयक आणले जात आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी संपन्न

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील राजभवन येथे संपन्न झाला असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.

Web Title: Nana patole has criticized the government over the beed and parbhani issue nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 04:49 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Nana patole
  • Parbhani Case

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.