सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे. यावरुन आता काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला सवाल केला आहे.
परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे.
परभणीतील रेल्वे स्थानकाबाहेर 10 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या काचेच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर हिंसाचाराच्या बातम्या आल्या होत्या.
व्यापारी, व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. त्यामुळे गांधी चौक ते मोठा बाजार, बसस्थानक परिसर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त होता.
सरकारच्या भूमिकेवर तोफ डागत भाजपा युती सरकारला लोकांच्या भावनांशी काही देणेघेणे नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.