Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Special Trains : नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

special trains for Nanded : गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 21, 2026 | 07:08 PM
नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

Follow Us
Follow Us:

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून २३ आणि २४ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता विशेष गाडी सुटेल. ही गाडी हजरत निजामुद्दीन, पानिपत, आग्रा कॅन्ट, विरांगणा लक्ष्मीबाई झांसी, बीना, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी १६.२० नांदेडला पोहोचेल .

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर

चंदीगड ते नांदेड (गाडी क्र. ०४५२४/०४५२३) आणि हजरत निजामुद्दीन ते नांदेड (गाडी क्र. ०४४९४/०४४९३) या दोन राखीव सुपरफास्ट विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. चंदीगडवरून २३ आणि २४ जानेवारी रोजी सकाळी ०५:४० वाजता सुटणारी गाडी अंबाला, पानिपत, दिल्ली सफदरजंग, आग्रा, विरांगणा लक्ष्मीबाई झाशी, भोपाळ, इटारसी, खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा मार्गे प्रवास करत दुसऱ्या दिवशी दुपारी १३:३० वाजता नांदेडला पोहोचेल.

मुंबई येथून देखील विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते नांदेड दरम्यान गाडी क्र. ०१०४१/०१०४२ ही विशेष रेल्वे २३ आणि २४ जानेवारी रोजी मुंबईहून दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता नांदेडला पोहोचेल. ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी या स्थानकांवर थांबेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी नांदेडवरून २४ आणि २५ जानेवारी रोजी रात्री २३:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १३:४० वाजता मुंबईला पोहोचेल. या गाडीत १८ डब्यांची रचना असून यात स्लीपर, जनरल आणि एसी कोचचा समावेश असेल.

या सर्व गाड्यांच्या नियोजनामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘सोशल डिस्टंसिंग’ आणि सॅनिटायझेशनसह सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, गाड्यांच्या सुयोग्य संचालनासाठी संबंधित विभागांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

BMC बजेट लांबणीवर? महापौर निवडीमुळे ५ फेब्रुवारीची मुदत हुकण्याची शक्यता; काय आहे नेमका पेच?

Web Title: Announcement of special trains for nanded to depart from delhi mumbai and chandigarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • delhi
  • Mumbai
  • Nanded

संबंधित बातम्या

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान
1

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत
2

BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे जागतिक नेत्यांचे भव्य फोटोसेशन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले परदेशी पाहुण्यांचे स्वागत

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा
3

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! दीड तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत, मढ-वर्सोवा केबल-स्टेड पुलाचा मार्ग मोकळा

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?
4

What is BRICS Country Group: ‘ब्रिक्स’ म्हणजे काय आणि त्याचा विस्तार कसा झाला? नेमका उद्देश काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.