
Ashok Chavan reacts to Shivsena support for BJP in Nanded Municipal Corporation
यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी कोणतीही अट न ठेवता महायुतीला पाठिंबा दिला असून त्यामुळे महायुतीचे संख्याबळ ४९ झाले आहे. या संख्याबळामुळे शहरासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणे सुलभ होणार आहे. महसूल आयुक्तांकडे महायुतीच्या नावाने प्रस्ताव पाठवण्यात आला असून सर्व प्रक्रिया रीतसर पार पडली आहे. महायुतीकडून महेश कनकदंडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून महापालिकेला भक्कम पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा : कोल्हापूरमध्ये बंडखोरीचा भडका; जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षीय नेतृत्वासमोर आव्हान
बिनशर्त पाठींबा जाहीर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमचे सातत्याने संवाद सुरू होते. त्यांनी स्वतः मला फोन केला. आमचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप झाले, मात्र ते वैयक्तिक नव्हते. आता सर्व काही सुरळीत आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले की, महापालिका निवडणुकीदरम्यान काही अडचणींमुळे युती होऊ शकली नाही. मात्र निवडणुका संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या विचाराने आम्ही युती करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दिला असून त्याबाबतच्या नोंदीही करण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा : इचलकरंजी महानगरपालिकेत पद 1 अन् इच्छुक 27; नेत्यांची कृपादृष्टीतील पहिला मानकरी कोण?
युती व्हावी, ही जनतेची इच्छा
यावेळी पुढे आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले, “जनतेचीही इच्छा युती व्हावी अशीच होती. जनतेच्या मनातील अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच उद्दिष्ट असून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. अर्धवट राहिलेले विकासकाम पूर्ण करण्यात येतील व शहराच्या विकासाला गती दिली जाईल. सर्वांचे विचार एकच असून येणाऱ्या काळात हितासाठी नांदेडच्या एकत्रितपणे काम केले जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांशी थेट संपर्क झाला नाही. वरिष्ठ पातळीवर युतीचे निर्णय होत असतात. प्रचारादरम्यान राष्ट्रवादीकडून आमच्यावर आरोप करण्यात आले, त्यामुळे आम्ही दुखावललो.जिल्हा परिषद निवडणुकीतही युती व्हावी, यासाठी प्रयत्न राहतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.