File Photo : Larvae in a packet
नांदेड : डी-मार्टमधून खरेदी केलेल्या शेवच्या बंद पाकिटांमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे. नांदेडमधील डी-मार्टमधून खरेदी केलेल्या हल्दीराम कंपनीच्या शेव पाकिटात अळ्या आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे या पाकिटांवर जुलै 2025 पर्यंतची एक्सपायरी डेट लिहिण्यात आलेली होती. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : Pune Metro: मंडईतील छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन होणार: महामेट्रोच्या प्रस्तावावर महापािलकेची भूमिका काय?
शहरामध्ये असलेल्या मोठ्या मॉलमध्ये जाऊन ग्राहक साहित्य खरेदी करत असतात. प्रामुख्याने बहुतांश शहरांमध्ये पोहचलेल्या डी-मार्ट आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी संख्या असते. येथे विक्रीसाठी असलेला माल चांगला असा विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करत असतो. मात्र, नांदेडमध्ये शेवच्या पाकिटात अळ्या निघाल्याने खळबळ उडाली आहे. अर्थात नावाजलेल्या कंपनीच्या बंद पाकिटांवर देखील विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न आहे.
धनंजय सूर्यवंशी यांनी नांदेड शहरातील डी मार्टमधून काही सामान खरेदी केले होते. त्यामध्ये हल्दीरामचे भुजिया सेवचे पाकीट देखील खरेदी केले होते. घरी जाऊन खाण्यासाठी शेवचे हे पाकीट फोडल्यानंतर अळ्या आढळल्या.
दुसऱ्या पाकिटांमध्येही अळ्या
हा प्रकार लक्षात आणून देण्यासाठी धनंजय सूर्यवंशी हे डी मार्टमध्ये गेले. यानंतर येथील दुसरे पाकीट देखील फोडून पाहिले असता या पॉकेटमध्ये सुद्धा अळ्या आढळून आल्या. विशेष म्हणजे या सर्व पाकिटांवर जुलै 2025 ही एक्सपायरी डेट छापलेली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची खेळ सुरू असल्याचा प्रकार पुढे आल्याने कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.