Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा…; मनसेचा इशारा

मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या नांदेड विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी अनेक मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेने आक्रमक होऊन इशारा दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2026 | 03:31 PM
स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा...; मनसेचा इशारा

स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने घ्या, अन्यथा...; मनसेचा इशारा

Follow Us
Follow Us:

नांदेड : नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मार्ट मीटरवरुन मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यभर बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकांना अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करत हे मीटर तात्काळ हटवून पूर्वीचे मीटर बसवावेत, अन्यथा महावितरणच्या कार्यालयावर ग्राहकांचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या नांदेड विभागाचे मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी अनेक मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराध्यक्ष अब्दुल सफिक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात, ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम राबविली जात असून त्यानंतर अनेक ग्राहकांना दीडपट ते दुप्पट वीजबिले येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच बिल भरण्यास विलंब झाल्यास पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे नमूद करण्यात आले. निवेदनात महावितरणकडून वीज कायद्यातील विविध तरतुदींचे पालन होत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास नुकसानभरपाई, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीतील विलंब, शेतजमिनीतील वीज खांब व ट्रान्सफॉर्मरचे भाडे तसेच कृषीपंपांना अंदाजे वीजबिल आकारणी आदी मुद्द्यांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन व महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

महावितरणकडून सक्तीची नोटीस 

यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, सदाशिव पाटील बोंढारकर, अनिकेतसिंह परदेशी, महेश ठाकूर, हेमंत पांचाळ, शंकर सरोदे, दिलीप राठोड, कृष्णा पेल्लेवाड, कृष्णा राठोड, अनुप पालदेवार यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. एकीकडे मनसेने आंदोलनाचा इशारा केलेला असताना महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करणारी नोटीस ग्राहकांना जारी केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; राजेंद्र खेडेकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Web Title: The mns has issued a warning to mahavitaran regarding smart meters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • MNS
  • MNS Chief Raj Thackeray

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.