Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत रस्ते अपघातात तब्बल १२४ जणांचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. ६ महिन्यांपूर्वी बनवलेले रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्याने यामागील धक्कादायक सत्य आणि प्रशासनाची निष्काळजीपणाची भूमिका आता चव्हाट्यावर आली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 23, 2026 | 02:17 PM
Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
Follow Us
Follow Us:
  • गोंदियात गेल्या आठ महिन्यांत २१५ अपघातांमध्ये १२४ जणांचा बळी तर ११४ जण गंभीर जखमी झाले.
  • पहिल्याच पावसात नवे रस्ते वाहून गेल्याने निकृष्ट दर्जाचे काम आणि भ्रष्टाचार समोर आला आहे.
  • जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिल्याच पावसाळ्यात सहा महिन्यांपूर्वी तयार केलेले रस्ते वाहून जात असतील, तर त्या रस्त्यांच्या गुणवत्तेची कल्पना करणे कठीण आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्त्यांच्या कामांची पोलखोल केली.

निकृष्ट बांधकामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्ते आता मृत्यूचे सापळे ठरत आहे. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात लहान-मोठे २१५ हून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून, ११४ जण गंभीर जखमी तर ४२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. काहींना कायमचे अपंगत्व आले. मात्र, एवढ्या गंभीर परिस्थितीनंतरही शासन आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

रस्ते बांधकामातील गुणवत्तेचा अभाव; ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती तर आणखी बिकट आहे. शासनाकडून रस्ते बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्यानंतरही रस्त्यांची गुणवत्ता कायम प्रश्नचिन्हाखाली आहे. बांधकाम साहित्याचा दर्जा, कामातील पारदर्शकता आणि देखभाल याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. रस्ते बांधकामातील अनियमितता, निकृष्ट साहित्याचा वापर आणि कथित कमिशन पद्धतीमुळे कामांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यातील सालेकसा, अर्जुनी-मोरगाव, देवरी, आमगाव तालुक्यांतील प्रमुख मार्गावरील पूल आणि रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. यातील काही पूल कालबाहा झाले असून, काही रस्त्यांचीही अशीच स्थिती आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आहे.

Gondiya News: विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर; गोंदिया बस आगाराचे ढिसाळ नियोजन एसटीच्या विलंबाचा विद्यार्थ्यांना बसतोय फटका

जीर्ण झालेल्या पुलांचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील किती पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, याची माहिती संबंधित विभागांकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आता स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे विभागांकडून सांगण्यात आले आहे. रस्ते हे कोणत्याही भागाच्या विकासाचे प्रतिबिंब मानले

विकासाच्या वाटेवर खड्डेच खड्डे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची दुर्दशा कायम असेल, तर हा निधी नेमका कुठे खर्च होतो, याची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांच्या जीवाशी संबंधित असलेल्या रस्ते आणि पुलांच्या कामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे.

Web Title: Gondia road accidents poor quality infrastructure issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Bad Roads
  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
1

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
2

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
3

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
4

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.