Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Politics: फडणवीसांची भेट अन् बदलेली भाषा…: पत्रकार परिषदेतच ठाकरेंनी बडगुजर यांचा विषय संपवला

सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी नाट्याच्या या खेळादरम्यान दोन दिवसापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाच्या वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडींही सातत्याने सुरू होत्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 04, 2025 | 02:28 PM
Nashik Politics: फडणवीसांची भेट अन् बदलेली भाषा…: पत्रकार परिषदेतच ठाकरेंनी बडगुजर यांचा विषय संपवला
Follow Us
Close
Follow Us:

Nashik Politics:  गेल्या काही तासांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला. नाशिक जिल्ह्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली. दोन दिवसांपू्र्वी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांची भाषा बदलली. त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. इतकेच नव्हे तर, आपल्यासोबत आणखी १०-१२ जणही नाराज असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या वर्तणुकीतून ते भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण बडगुजर यांनी निर्णय घेण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

सुधाकर बडगुजर यांच्या नाराजी नाट्याच्या या खेळादरम्यान दोन दिवसापूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नाशिकचा ठाकरे गटाच्या वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडींही सातत्याने सुरू होत्या. या सगळ्यात आज ( ४ जून) ठाकरे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी फोन करत बडगुजर यांची हकालपट्टी करत असल्याचे सांगितले. त्यानंतर विद्यमान जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेतही बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. आम्ही आदेश पाळतो, आम्ही पक्षप्रमुखांना प्रश्न विचारत नाही, असेही सुर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भारताच्या ‘या’ मित्राला खूश करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; शाहबाज यांनी पाठवला खास संदेश, जाणून घ्या

दरम्यान, बडगुजर यांच्या हकालपट्टीने पक्षात नाराज असलेल्यांना एक संदेश गेल्याचे बोलले जात आहे.  पण नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांसह इतर नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, त्यामुळे आपण नाराज असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले होते.

दरम्यान, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना नेत्यांनी भाजपच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. डी.जी. सुर्यवंशी म्हणाले, “शिवसेना कधीच संपणार नाही. गिरीश महाजन यांची बडबड सुरूच आहे, पण जनतेला हे समजतेय की भाजपचा विस्तार शिवसेनेच्या खांद्यावरच झाला. तुमच्याकडे पालकमंत्री देण्याची ताकद नाही आणि वर म्हणता पक्ष संपवायला निघालोय? ही शिवसेना संपवणं कोणाच्याही हातात नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी त्यांनी दिला.

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार

बैठकीला कोअर कमिटीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, याकडे लक्ष वेधत, “इथे कोणीही डबल रोलमध्ये नाही,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला. दत्ता गायकवाड म्हणाले, ‘ शिवसेनेत कुणाची नियुक्ती करायची त्याचे निर्णय उद्धव ठाकरे घेतात, आणि ते सामनातून जाहीर केले जाते. बडगुजर उपनेते झाले त्यावेळी कुणाला विचारले होते. असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Nashik shiv sena press conference sudhakar badgujar expulsion sanjay rauts orders what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Nashik Politics
  • sanjay raut
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
2

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
3

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
4

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.