WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username
मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात 2 बिलीयनहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp मध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल जोडले आहेत. हे बदल इंस्टाग्रामसारखेच आहेत. स्टेटसमध्ये म्युझिक फिचर, फोटोंसाठी लेआऊट, मेंशन इन स्टेटस असे अनेक फीचर्स WhatsApp मध्ये जोडण्यात आले आहेत. या सर्व फीचर्सनंतर आता WhatsApp मध्ये आणखी एक नवीन फीचर लवकरच जोडलं जाणार आहे. हे फीचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील फीचरप्रमाणेच आहे.
जर आपल्याला WhatsApp वर एखाद्या व्यक्तिला मेसेज करायचा असेल किंवा कॉल करायचा असेल तर नंबरची गरज असते. पण आता असं होणार नाही. कारण लवकरच रिलीज केल्या जाणाऱ्या फीचरनंतर युजर्स फोन नंबरशिवाय WhatsApp वर मेसेज करू शकणार आहे. पण यासाठी गरज असेल युजरनेमची. WhatsApp मध्ये आधीपासूनच अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये डिसअपीयरिंग मेसेजेस, चॅट लॉक आणि इतर अनेक अपडेट्सचा समावेश आहे. या सर्व फीचर्सनंतर आता WhatsApp मध्ये एक नवीन फीचर जोडलं जाणार आहे. हे फीचर असणार आहे ‘WhatsApp यूजरनेम’. कंपनी या फीचरची चाचणी करत आहे. या फीचरनंतर युजर्स फोन नंबर शेअर केल्याशिवाय चॅटिंग करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp च्या बीटा वर्जन (2.24.18.2) मध्ये हे फीचर आढळलं आहे. सध्या हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलेलं नाही. मात्र अशी आहे की, लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. एकदा हे फीचर रिलीज झाल्यानंतर युजर्स फोन नंबर शेअर न करता मेसेज करू शकणार आहेत. हे फीचर युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं ठरणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे फीचर युजर्सना मदत करणार आहे.
2009 मध्ये स्टेटस अपडेट अॅप म्हणून लाँच झालेल्या व्हॉट्सअॅपचे जगभरात 2 अब्जाहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. कंपनी व्हॉट्सअॅपवर अनेक फीचर्स आणत राहते. आता लवकरच WhatsApp यूजरनेम सुरु करणार आहे. ज्यामुळे युजर्स त्यांचं अकाऊंट हँडल तयार करू शकणार आहेत. हे टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर दिसणाऱ्या अकाऊंट हँडलप्रमाणेच असणार आहे. हे फीचर रिलीज झाल्यानंतर फोन नंबरशिवाय चॅटिंग करणं सोपं होणार आहे. एक यूजर दुसऱ्या युजरला यूजरनेमचा वापर करून सर्च करू शकणार आहे. हे विशेषतः ग्रुप चॅटमध्ये किंवा तुम्हाला अनोळखी लोकांशी कनेक्ट होताना उपयुक्त ठरू शकते.
असे म्हटले जात आहे की WhatsApp चा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी, कंपनी WhatsApp यूजर नेमसाठी काही नियम सेट करू शकते. यामध्ये www ने सुरू न होणारे यूजर नेम, फक्त लोअरकेस अक्षरे असणे इत्यादींचा समावेश आहे.