Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! वीज खांबावरील बिघाड दुरूस्त करताना बसला जोरदार शॉक; तरुणाचा जागीच मृत्यू

नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील आढाव मळा येथे वीज खांबावरील बिघाड दुरुस्त करत असताना अचानक हायव्होल्टेज करंट लागून महावितरणच्या एका २८ वर्षीय तरुण तंत्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2026 | 03:23 PM
विजेचा धक्का; तरुण तंत्रज्ञाचा मृत्यू

विजेचा धक्का; तरुण तंत्रज्ञाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

नाशिकरोड : महावितरणच्या ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराचा आणखी एक बळी नाशिकमध्ये गेला आहे. नाशिकरोड येथील जेलरोड परिसरातील आढाव मळा येथे वीज खांबावरील बिघाड दुरुस्त करत असताना अचानक हायव्होल्टेज करंट लागून महावितरणच्या एका २८ वर्षीय तरुण तंत्रज्ञाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आढाव मळा, पिंटो कॉलनी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर महावितरणच्या शिवाजीनगर कार्यालयात कार्यरत असलेले तंत्रज्ञ जय मुकुंद सकट (वय २८, रा. साईनाथनगर, जेलरोड) आणि त्यांचे सहकारी राजेश सुरेश चौरे (रा. जत्रा हॉटेल परिसर) हे दोघे बुधवार (दि. १) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज खांबावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी चढले होते. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच, अचानक खांबामध्ये जोरदार विद्युतप्रवाह (हायव्होल्टेज करंट) उतरला. हा भीषण धक्का इतका मोठा होता की, दोघेही थेट खांबावरून खाली कोसळले. या दुर्घटनेत जय सकट यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजेश चौरे हे गंभीर जखमी झाले.

बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. सध्या राजेश चौरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

या भीषण दुर्घटनेमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शटडाऊन घेतला नव्हता का? मध्यरात्रीपासून शॉर्टसर्किट होत असताना आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना वीजपुरवठा पूर्णपणे खंडित का केला गेला नव्हता? तांत्रिक चूक की मानवी चूक? काम सुरू असताना अचानक वीजप्रवाह कसा सुरू झाला? सुरक्षा साधनांची वानवा? कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा साधने दिली गेली होती का? या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत, या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? याचा शोध घेण्यासाठी महावितरणकडून वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

चिमुरड्याचे छत्र हरपले; कुटुंब पडले उघड्यावर !

मृत जय सकट हा कोविड काळानंतर महावितरण कंपनीत सेवेत रुजू झाला होता. अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या जय याच्या अचानक जाण्याने सकट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक भाऊ आणि अवघ्या दोन वर्षांचा लहान मुलगा असा परिवार आहे. कमावता तरुण मुलगा गमावल्याने जेलरोड परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे, तर महावितरणच्या कारभाराविरुद्ध नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

Web Title: A youth died due to severe electric shock while repairing a fault on an electricity pole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Electric Shock
  • Nashik News

संबंधित बातम्या

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार
1

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार; एक-दोन नाहीतर तब्बल 105 साक्षीदार तयार

अनुदानित आश्रमशाळांची रोस्टर पडताळणी होणार; 5 जुलैचा अंतिम अल्टिमेटम
2

अनुदानित आश्रमशाळांची रोस्टर पडताळणी होणार; 5 जुलैचा अंतिम अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.