Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या त्र्यंबक नाका परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2026 | 03:23 PM
नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला
  • दोन संशयित ताब्यात
  • नाशिकमधील घटनेनं खळबळ
नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या त्र्यंबक नाका परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रेम हिरे (वय ३५) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी त्र्यंबक नाका परिसरात ही घटना घडली आहे. प्रेम हिरे हा तरुण या परिसरातून जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी तरुणाला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रोहित सोनवणे आणि पवन पाटील अशी या संशयितांची नावे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या नावांची आणि घटनेतील भूमिकेची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

हल्ल्यामागील कारणाचा शोध सुरू

प्रेम हिरे याच्यावर हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संशयितांची चौकशी करून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर हल्ल्याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: An incident involving a life threatening attack on a young man has occurred in the trimbak naka area of nashik nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
1

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत
2

IIT भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक जुगाड; गोवा विमानतळावर दोन ‘मुन्नाभाई’ अटकेत

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा
3

पुण्यात घरफोडी करणाऱ्या जोडप्यासह तिघांना अटक; सीसीटीव्हीच्या मदतीने लावला गुन्ह्याचा छडा

पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला
4

पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.