Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat प्रकरणात नाशिक पोलिसांची हाताची घडी, SIT चे तोंडावर बोट; बड्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न की राजकीय स्वार्थ?

अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांची निष्क्रियता आणि SITची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बड्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 06, 2026 | 11:30 AM
Ashok Kharat प्रकरणात नाशिक पोलिसांची हाताची घडी, SIT चे तोंडावर बोट; बड्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न की राजकीय स्वार्थ ?

Ashok Kharat प्रकरणात नाशिक पोलिसांची हाताची घडी, SIT चे तोंडावर बोट; बड्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न की राजकीय स्वार्थ ?

Follow Us
Close
Follow Us:
  • तपासाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
  • बड्या धेंडांना वाचवण्याचा प्रयत्न की राजकीय स्वार्थ ?
  • भोंदू बाबाचे काळे कारनामे
अरविंद जाधव, नाशिक : तंत्र-मंत्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदू अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दररोज वाढत आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आणि त्यांच्या प्रमुखांनी नेमकी काय प्रगती केली, हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही. या गुन्ह्याला महिना होत आला असून, नाशिक पोलीस आयुक्तालयाने सुरुवातीपासूनच या प्रकरणावर हाताची घडी घातली आहे, तर एसआयटीनेही तोंडावर बोट ठेवल्याने आता उलटसुलट चर्चांना उधाण आले.

विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या आदेशान्वये १३ मार्च रोजी एसआयटीची स्थापना करण्यात आली. १९ मार्चपासून हे पथक नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत ठाण मांडून आहे. मात्र, तपासाबाबत ज्या प्रकारे न्यायालयात बचाव पक्षाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तसेच संशय आता जनमानसातही बळावू लागला आहे.

Ashok Kharat Private Video: अशोक खरात प्रकरणात ममता कुलकर्णी ट्रोल, व्हायरल व्हिडीओवर दिलेल्या समर्थनामुळे वाद सुरु

खरातविरुद्ध आतापर्यंत १२ गंभीर गुन्हे दाखल झाले असून, त्यात ८ लैंगिक अत्याचार, सावकारी, खंडणी आणि फसवणुकीचा समावेश आहे. या प्रकरणाची व्याप्ती केवळ बलात्कारापुरती मर्यादित नाही, हे शिर्डी पोलिस ठाण्यात या वर्षांच्या सुरूवातीला दाखल झालेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यातून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही ही माहिती दडवून एसआयटी नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा सवाल विचारला जात आहे.

बड्यांच्या हितसंबंधांमुळे एसआयटी दबावाखाली?

या गुन्ह्यात अनेक बड़े राजकीय नेते, सनदी अधिकारी तसेच उद्योगपतींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याची चर्चा आहे. हा संबंध उघड करण्याची जबाबदारी असलेल्या एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते या मागील १८ मार्चपासून या प्रकरणापासून चार हात दूर आहेत की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. न्यायालयात अनेकदा तपास अधिकारी दडपणाखाली असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे, शिर्डी पोलीस तपासाची माहिती माध्यमांना नियमितपणे देत असताना नाशिकमध्येच कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याने या विरोधाभासामागील नेमके कारण काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

आदेश धाब्यावर की केवळ राजकीय स्वार्थ?

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी यातील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास ‘ईडी’ (सक्त वसुली संचालनालय) करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, अत्याचार आणि आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाची विभागणी नेमकी कशी असेल, यावर स्पष्टता नाही. गृहमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश असतानाही एसआयटीने तपासाभोवती निर्माण केलेले ‘गूढ वलय गुन्हेगारांना मदत करण्यासाठी आहे की मोठ्या धेंडांना वाचवण्यासाठी? या प्रकरणाचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी होऊ नये, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तपासाचे गुढ आणि अनुत्तरित प्रश्न

नरबळी आणि गर्भपातः बलात्काराच्या गुन्ह्यात नरबळीसारखा गंभीर मुद्दा समोर आला होता. गर्भपात प्रकरणी डॉक्टरांची चौकशी झाल्याचे सांगितले जाते, मात्र एसआयटीने यावर मौन का पाळले आहे?

ललित पोफळेचे काय झाले? या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या ललित पोफळेबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

नाशिक पोलिसांना मज्जावः खरातविरुद्ध दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती नाशिक शहर पोलिसांना देण्यासही मज्जाव करण्यात आल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात आहे.

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Web Title: Ashok kharat case nashik police inaction sit silent questions over political pressure and shielding influential people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Nashik
  • police

संबंधित बातम्या

Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये ‘शिवसंवाद’; ताफा बाजूला सारत ‘वंदे भारत’ने केला प्रवास
1

Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदेंचा नाशिकमध्ये ‘शिवसंवाद’; ताफा बाजूला सारत ‘वंदे भारत’ने केला प्रवास

Mumbai Bandra Demolition: वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत
2

Mumbai Bandra Demolition: वांद्रे गरीबनगर कारवाईला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत

Nashik News : आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख  
3

Nashik News : आगामी सिंहस्थासाठी मोठी खुशखबर! ओझर विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मंजुरी, नाशिकच्या विकासाला नवे पंख  

Nashik Crime: मन सुन्न करणारी घटना! प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ; ‘तुझ्या मुलांना स्वीकारणार नाही’ म्हणत 8 वेळा गर्भपात
4

Nashik Crime: मन सुन्न करणारी घटना! प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ; ‘तुझ्या मुलांना स्वीकारणार नाही’ म्हणत 8 वेळा गर्भपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.