150हून अधिक महिलांचे शोषण, अशोक खरातची HIV Test...; काय आहे रिपोर्टमध्ये
फॉरेन्सिक टीमने कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली. याशिवाय कार्यालयातील काही संशयित वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे या प्रकरणात काही नवे खुलासे समोर येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
दरम्यान, न्यायालयाने अशोकखरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात खरात याने १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर काल पोलीस कोठडीतच त्याची HIV टेस्ट करण्यात आली. रिपोर्टनुसार त्याची HIV टेस्ट निगेटिव्ह आली आहे. महिलांचे भविष्य सांगण्याच्या आणि त्यांच्या जीवनातील अडचणी सोडवण्याच्या बहाण्याने १५० हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर नाशिक पोलीस ठाण्यात ८ पैकी सात गुन्हे महिला अत्यचाराअंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या महिला गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे आल्या, त्या महिला वगळता इतर कोणत्याही महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या नाहीत. अशोक खरात याने अनेक महिलांवर शारिरीक अत्याचार केल्यामुळे महिलांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यासाठीच ही टेस्ट करण्यात आली, पण खरातचे HIV टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
अशोक खरात व्हॉटसअपवर व्हॉईस मॅसेजने संपर्क करत होता- (Ashok Kharat Case) तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा व्हॉटसअपवर व्हॉईस मॅसेजद्वारे महिलांशी संपर्क साधत असे. पण मोबाईलमधील काही मेसेज डिलीट केल्याची शक्यता असल्याने खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. एसआयटीने (SIT) खरातचा मोबाईल जप्त केला असून, त्यातील ‘व्हाइस टायपिंग’ आणि दैनंदिन संपर्क यांतून अनेक धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता आहे.
Pune Crime: अध्यात्माच्या नावाखाली पाप! शंकराचा ‘अवतार’
डेटा रिकव्हरी: मोबाईलमधील डिलिट केलेला डेटा आणि जुने संभाषण रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. यातून खरातच्या संपर्कात असणाऱ्या बड्या व्यक्तींची नावे उघड होऊ शकतात.
दैनंदिन संपर्कांची चौकशी: खरात दररोज कोणाच्या संपर्कात होता आणि त्याला या कृत्यांत कोणाचे सहकार्य लाभले, याची कसून चौकशी केली जाणार आहे.
तांत्रिक पुरावे: लैंगिक शोषणाचे गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असून, मोबाईलमधील तांत्रिक पुरावे खरातला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.






