
BJP did not achieve complete success in key wards of the Nashik Municipal Corporation elections 2026
नाशिकमध्ये अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का बसला होता. मात्र आता निकालानंतर भाजपचे वारे फिरले असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे बडगुजर यांच्या घरामध्ये चार तिकीटे दिली होती. मात्र निवडणुकीमध्ये बडगुजर यांना मोठा धक्का बसले आहे. नाशिकच्या प्रभाग 25 चा निकाल समोर आला आहे. 4 पैकी 2 जागांवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी झाल्या आहेत. तर इतर 2 जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी झाले आहेत. भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत झाले आहेत.
हे देखील वाचा : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी
प्रभाग क्रमांक 25 हा प्रामुख्याने सिडको आणि कामटवाडे परिसराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या प्रभागात रायगड चौक, पाटील नगर, सावता नगर, उंटवाडी गावठाण आणि त्रिमुर्ती चौक यांसारख्या प्रमुख रहिवासी क्षेत्रांचा समावेश होतो. या प्रभागामध्ये दाट लोकवस्ती असून लोकसंख्या 38000 ते 42000 च्या दरम्यान असून, येथे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाची मोठी वस्ती आहे. या प्रभागातील मुख्य समस्यांचा विचार करता, अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित काँक्रिटीकरण, पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी आणि त्रिमुर्ती चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हे मोठे प्रश्न आहेत.
हे देखील वाचा : पुण्यात मतमोजणी केंद्रावर राडा! ठोंबरेंनी केला EVM मशीन बदलल्याचा गंभीर आरोप
नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये अंबड लिंक रोड आणि पवन नगर परिसर आहे. त्याचबरोबर या प्रभागामध्ये औद्योगिक क्षेत्र देखील लागून आहे. या प्रभागात खुटवड नगर, डी.जी.पी. नगरचा काही भाग आणि सिडकोच्या सेक्टरमधील दाट लोकवस्तीचा समावेश होतो. येथील लोकसंख्या साधारण 40000 ते 44000 च्या आसपास आहे. या प्रभागाची सर्वात मोठी समस्या म्हणजे अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असल्यामुळे होणारे प्रदूषण आणि अवजड वाहनांची वर्दळ, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते आणि काही भागांत होणारा विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीच्या वेळा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यांकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दिलीप दत्तू दातीर (शिवसेना) हर्षदा संदीप गायकर (शिवसेना), अलका कैलास अहिरे (भाजप), भागवत पाराजी आरोटे (शिवसेना) या उमेदवारांनी विजय मिळवला होता.