मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (फोटो- सोशल मीडिया)
लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार
नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याचा अंदाज
अद्याप दोन महिन्यांचा हप्ता शिल्लक
रत्नागिरी: योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. लाडक्या बहिणीना गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता अजूनही मिळालेला नाही. निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली त्याचा फायदा महायुतीला मिळाला. महिलांच्या बंपर व्होटिंगमुळे महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले, मात्र सत्तेवर येताच या योजनेच्या लाभार्थी महिलांची फेरपडताळणी किंवा छाननी करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी अर्ज केले त्यांची कोणतीही पडताळणी न करता त्यांना लाभदेण्यास सुरुवात झाली. पुन्हा सत्ता मिळताच या योजनेचा मोठा ताण सरकारच्या तिजोरीवर पडत असल्याने लाभाच्यांच्या अर्जाची फेरपडताळणी सुरू करण्यात आली.
चुकीची माहिती देत गैरफायदा घेतल्याचे उघडकीस
ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या, ज्या प्रत्यक्षात अपात्र ठरतात, परंतु लाभ घेत आहेत अशा बहिणीची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. काही जिल्ह्यामध्ये तर चक्क पुरुषानीच या योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आले, त्याच्याकडून आता दिलेल्या पैशाची वसुली करण्यात येणार असून, फसवणुकीबद्दल रीतसर कारवाईदेखील करण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…
५३ बहिणींनी छाननीनंतर स्वतःहून घेतले अर्ज मागे
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता तब्बल ४७हजार नावे कमी झाली आहेत, त्यांनी या योजनेचा चुकीची माहिती देऊन गैरफायदा घेतल्याचे पुढे आले आहे. ज्यांच्याकडे चारचाकी, सरकारी नोकरी किवा वयोमर्यादा ओलांडली आहे, प्राप्तिकर भरला आहे अशा बहिणींची नावे आता यादीतून वगळण्यात आली आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातून जवळपास ४ लाख २० हजार ४४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते.
Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी
चौकशी आणि छाननीनंतर त्यातील ४६ हजार ९६३ लाभार्थी निकषात बसत नसल्याने कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, ५३ बहिणींनी छाननीनंतर स्वत हुन या योजनेचा लाभआपल्याला नको, असे कळवले आहे. आता केवायसी अनिवार्य करण्यात आल्याने आणखी काही नावे रद्द होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात या योजनेच्या ३ लाख ४७ हजार ४४७महिला लाभार्थी आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






