Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण

नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या अखेरच्या दिवशी महायुतीत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजप समर्थक आणि अजित पवार गटातील नाराजी उघड झाली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2026 | 02:01 PM
नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण

नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण

Follow Us
Follow Us:
  • नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा
  • शिंदे गटासमोर गिते बंधूंचे आव्हान
  • महाविकास आघाडीची भूमिका निर्णायक
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हाय होलटेज ड्रामा पहावयास मिळाला. महायुतीने शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी, भाजपा समर्थक व राष्ट्रवादी अजितप पवार गटाच्या नेत्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपाकडून या अगोदरच गणेश गिते यांनी अर्ज दाखल केलेला असतांना सोमवारी त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतल्याने त्यांची उमेदवारी शिंदे गटासाठी दगाफटका करणारी ठरू शकते, त्याच वेळी अजित पवार गटाने ‘विश्वासाचा’ मुद्दा उपस्थित करून शिंदे गटापुढे अडचणी उभ्या केल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसांपासून महायुतीत जागा कोणाला सुटणार या विषयीचा घोळ सुरूच राहिला. त्यामुळे महायुतीत अनेकांच्या उमेदवारीची चर्चा रंगली. त्यामुळे बेबनाव निर्माण झाला.

भाजपात नाराजी

भाजपाचे मतदारसंघात वर्चस्व असल्यानेही जागा न सुटल्याने नाराजी जाणवली, मात्र शिंदे गटाची उमेदवारी दाखल करतांना भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत सर्व काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी महाविकास आघाडीतील एकवाक्यतेचा अभाव दिसून आला. नाशिकची जागा ठाकरे गट लढविणार असे सांगितले जात असतांना अखेरच्या दिवशीही कोणीही उमेदवार पुढे न आल्याची नामुष्की ओढवली आहे.

Satara Politics : शपथपत्रातील माहितीवरून दोन नगरसेवक अडचणीत; अपात्रता प्रकरणाची सुनावणी 14 जुलैला

शिंदे सेना, राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित

नरेंद्र दराडे यांचा अर्ज दाखल करताना शिंदे सेनेने शक्तीप्रदर्शन केले असले तरी, यावेळी पक्षाचे आमदार सुहास कादे, सचिव भाऊसाहेब चौधरी है गैरहजर होते तसेच राष्ट्रवादीचे फक्त शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनीच हजेरी लावली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असतांना त्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने त्याची वेगळीच चर्चा झडली. एवढेच नव्हे तर नाशिकची जबाबदारी असलेल्या भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन हे देखील अनुपस्थित असल्याने महायुतीत सारे काही अलबेल असल्याचे जाणवले नाही. यावेळी बोलतांना मंत्री दादा भुसे यांनी, महायुतीने सर्व संमतीने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले.

भाजपाचे गणेश गिते यांनी अर्ज दाखल केला असला तरी, महायुतीचा निर्णय रविवारी रात्री उशीरा झाला. त्यामुळे गिते यांनी तत्पुर्वी दाखल केला असेल तर त्यांची समजूत काढण्यात येणार असल्याचे सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून, ते बाहेर आहेत. तर मंत्री महाजन है जळगावचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित असल्याने त्यांना येथे येणे शक्य होणार नसल्याचे कळविले आहे.

गोकूळ गितेंचा कॉन्फिडन्स

गणेश गिते यांचे बंधू गोकूळ गिते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, विजयाचे गणित यांनी अलगद उलगडून सांगितले. आजपावेतो बहुमत नसतांनाच उमेदवार निवडून आल्याचे दाखले त्यांनी दिले. त्यात स्य. वसंत पवार, देवीदास पिंगळे, जयंत जाधव यांचे उदाहरणे दिले, विद्यमान आमदारांनी आठ वर्षे मतदारसंघासाठी काहीच केले नाही, ते फक्त त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले असा आरोप करून आपल्या उमेदवारीमागे कोणाचाही हात नाही. सध्या फक्त मला शिंदे सेनेचा उमेदवारच रिंगणात दिसत असून, मला मतदारांचा पूर्ण पाठिबा असल्याचे त्यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून आपण मतदारांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे. आपल्या उमेदवारीमागे कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणीही पाठिंबा दिलेला नाही, मात्र नजीकच्या काळात सर्वच मतदारांच्या आपण गाठीभेटी घेऊन आपली भूमिका पटवून देवू, गणेश गिते यांनी काय व कोणत्या पक्षाकडून अर्ज दाखल केला, याविषयी आपण काहीही सांगू शकत नाही, असे ते म्हणाले.

Sanjay Raut PC: ‘स्वाभिमान जागा झाला असेल तर मातोश्रीवर या’; अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर संजय राऊतांचे खुले आव्हान

Web Title: Nashik mlc election mahayuti drama gokul gite independent candidature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:01 PM

Topics:  

  • Mahayuti
  • MLC Election
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
3

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
4

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.