Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प

Nashik News: विकेंड आणि श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे नाशिक-त्र्यंबक मार्गावर वाहतूक कोंडी झाली. उखडलेले रस्ते, खड्डे आणि मार्गावर घडणाऱ्या अपघातांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून भाविकांसह वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 12:29 PM
श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प

श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प

Follow Us
Follow Us:
  • विकेण्ड अन् श्रावणी सोमवारच्या गर्दीने नाशिक-त्र्यंबक रस्ता जाम
  • उखडलेले रस्ते आणि अपघातांमुळे भाविक हैराण
  • भाविकांचा विकेंड वाहतूक कोंडीत
नाशिक : स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, लागून आलेला विकेंड आणि त्यातच पहिला श्रावणी सोमवार असा दुग्धशर्करा योग आल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर शुक्रवारपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले संथ गतीचे काम आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे या मार्गावर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणासाठी हा रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून एका बाजूने खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी पर्यटकांसह भाविकांची अलोट गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. त्यातच गेल्या दोन दिवसांत पडलेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमधून होणाऱ्या ऑईल गळतीमुळे हा मार्ग अधिकच निसरडा बनला आहे. (Nashik News Marathi)

Wine Capital of India: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘या’ शहराला म्हणतात भारताची ‘वाइन कॅपिटल’?

सहा महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम संथगतीने

सहा महिने उलटूनही रस्ते विकासाच्या कामात कोणतीही समाधानकारक प्रगती झालेली नाही. या विकेंडला झालेली दाणादाण पाहता, यंदाच्या संपूर्ण श्रावण महिन्यात त्र्यंबकराजाचे दर्शन घेणे भाविकांसाठी अत्यंत कठीण आणि त्रासदायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून रस्ता सुरळीत करावा, अशी तीव्र मागणी नाशिककर व भाविकांमधून केली जात आहे.

या निसरड्या रस्त्यामुळे गेल्या दोन दिवसांत किमान १०० हून अधिक दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात घडले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी अनेक नागरिक व भाविक जखमी झाले आहेत. १०० हून अधिक दुचाकी या निसरड्या रस्त्यामुळे गेल्या दोन दिवसांत घसरून अपघात घडले आहेत.

श्रावणी सोमवार आणि विकेंडच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने खासगी वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील वाहनतळाची क्षमता अपुरी असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरून येणारी खासगी वाहने शहरात न नेता खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबविण्यात येणार आहेत. कार, टॅक्सी, रिक्षा तसेच इतर चारचाकी खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वर शहरात न जाता खंबाळे येथील बाह्य वाहनतळाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भाविकांसाठी एसटी बसची व्यवस्था

खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर वाहने उभी केल्यानंतर भाविकांना त्र्यंबकेश्वर शहरात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाविकांच्या संख्येनुसार आवश्यकतेनुसार अतिरिक्त बससेवा वाढविण्यात येणार असून, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर अशी पुढील वाहतूक एसटी बसद्वारे केली जाणार आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील अरुंद रस्त्यांवरील खासगी वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय

Web Title: Nashik news trimbakeshwar road traffic jam weekend shravani monday devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • Nashik
  • Traffic
  • Trimbakeshwar

संबंधित बातम्या

Ulhasnagar Traffic Jam : वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती
1

Ulhasnagar Traffic Jam : वाहतूक कोंडीने गाठली परिसीमा! रुग्णालय गाठण्याआधीच रिक्षेत महिलेची प्रसूती

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
2

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित
3

Nashik Farmers Distressed : येवल्यात कोबी उत्पादकांना दुष्काळाची झळ! कोबी कवडीमोल भावाने,शेतकरी व्यथित

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
4

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.