फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Wine Capital of India : भारतात जर कोणत्या शहराला द्राक्षांची राजधानी म्हटेल जात असेल तर ते महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला म्हटले जाते. विशेष म्हणजे येथील द्राक्षांची शेती ही मोठ्या प्रमाणात असल्याने येथे वाइनचे उत्पादन होते. याच कारणामुळे नाशिकला “वाइन कॅपिटल” (Wine Capital of India) असेही संबोधले जाते. येथे दरवर्षी लाखो द्राक्षांचे उत्पादन होते, ज्याचा पुरवठा देशातच नव्हे तर परदेशातही केला जातो. अलीकडे वाइन टुरिझममुळे हे शहर वेगाने लोकप्रिय होत आहे.
पश्चिम घाटाच्या डोंगररांगांमध्ये सुमारे ६०० ते ७०० मीटर उंचीवर नाशिक शहर वसलेले आहे. द्राक्षाच्या शेतीसाठी येथील थंड हवामान अधिक उत्तम असल्याचे मानले जाते. याव्यतिरिक्त, येथील काळी कसदार सुपीक मृदा आणि गोदावरी नदीचे पाणी द्राक्ष शेतीला अधिक समृद्ध बनवते. येथे वर्षाला ६०० ते ८०० मिमी पर्यंत पाऊस पडतो, जो द्राक्षेच्या पिकासाठी पुरेसा मानला जातो. याच कारणामुळे येथे उत्पादित होणारी द्राक्षे चव आणि गुणवत्तेत खूपच चांगली असतात.
नाशिकमध्ये आधुनिक वाइन इंडस्ट्रीची सुरुवात वर्ष १९९७ मध्ये झाली, जेव्हा येथे पहिली व्यावसायिक वायनर ‘सुला वाइनयार्ड्स’ (Sula Vineyards) सुरू करण्यात आली. या काळात वाइनचे उत्पादन जवळजवळ शून्य होते आणि बहुतांश वाईन परदेशातून मागवण्यात येत होती. मात्र, आज येथे ३० पेक्षा जास्त वायनरी कार्यरत आहेत. तसेच येथे तयार होणाऱ्या वाइननी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सरकारने या शहराला अधिकृतपणे “वाइन कॅपिटल” म्हणून दर्ज दिला. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक ‘वाइन टेस्टिंग’ (Wine Testing) आणि वाइन टूरसाठी येतात.
नाशिक हे केवळ द्राक्ष बागायतीसाठीच नव्हे, तर पर्यटन आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे येणारे पर्यटक वाइन यार्ड्सला भेट देतात पण त्याचबरोबर गोदावरी नदेचे विलोभनीय घाट, प्राचीन मंदिरे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा देखील आस्वाद घेतात. येथील शांत वातावरण आणि हिरवळ या शहराला उत्तम ट्रायव्हल डेस्टिनेशन बनवते. याच कारणामुळे नाशिक आता फिरण्याची आवड असणाऱ्या तरुणासाठी लोकप्रिय ठिकाण बनत आहे.






