
फोटो सौजन्य सोशल मिडिया
मिळालेल्या माहिती नुसार हायवा ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकी हायवाखाली गेली पण दुचाकी चालकाने वेळीच बाजुला उडी मारली. यामुळे दुचाकी स्वाराचा जिव वाचला. काहीवेळेच्या क्षणात हायवा ट्रकने पेट घेतला. हायवा ट्रक आणि दुचाकी जागीच जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पेठ रस्त्यावर उमराळे गावाजवळ दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. असे सांगण्यात येते.
या अपघातात हायवा ट्रकने दुचाकीला फरफट नेले यामुळे दोन्ही गाड्यामध्ये घर्षण झाले; हायवा ट्रकच्या डिझेल टाकीने पेट घेतला. दुचाकी हायवा ट्रकच्या खाली अडकून घसरत गेल्यानंतर हायवा ट्रकच्या डिझेल टँकचा स्फोट झाला. दुचाकी चालक बाजूला फेकला गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला. तसेच हायवा ट्रकच्या ड्रायव्हरनेही दुचाकी ही ट्रकखाली अडकल्याचे पाहिले आणि ट्रक ड्रायव्हरनेही वेळीच उडी मारली. यामध्ये दुचाकी चालक आणि हायवा ट्रक ड्रायव्हरने बाहेर उडी मारल्यानंतर काही वेळातचं ट्रकने पेट घेतला. ट्रकला भीषण आग लागली असून रस्त्याच्या मधोमध हायवा ट्रक जळला.
हायवा ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाने काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. अपघातातील हायवा ट्रक आणि दुचाकी पूर्णतः जळून खाक झाले आहेत. अपघातामुळे काही काळ रस्त्यावर बराचवेळ वाहतूक थांबवण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबचं-लांबरांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण आग आटोक्यात आल्यानंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.
Ans: नाशिक-पेठ रस्त्यावरील उमराळे गावाजवळ.
Ans: दहा चाकी हायवा ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
Ans: वेळीच बाहेर उडी मारल्याने जीवितहानी टळली.