Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Pothole Deaths: रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी

Nashik Pothole Deaths News Marathi: नाशिकमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महापौर, महापालिका आयुक्त, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरू आहे....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 11:31 AM
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या खड्ड्यांनी घेतले पाच बळी
  • महापौर, आयुक्त आणि ठेकेदारांविरोधात जनहित याचिका
  • प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी
 

अरविंद जाधव, नाशिक : नाशिक गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते खोदून (Nashik Pothole Deaths) ठेवले आहेत. उन्हाळ्यात रस्त्यांची अपेक्षित डागडूजी किंवा नवीन कामे न करता, महापालिका प्रशासन आणि सरकारने एकाच वेळी सर्व कामे हातात घेतल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नाशिककरांना रस्त्यांवरून चालताना जीवघेणी कसरत करावी लागत असून, गेल्या चार महिन्यांत वेगवेगळ्या अपघातांत खड्यांमुळे तब्बल पाच निष्पाप नागरिकांचा बाद गेला आहे. या दुर्दैवी मृतांमध्ये निलेश कोतकर, प्रभाकर निकम, दिपाली बेळे आणि प्रवीण गायकवाड यांचा समावेश आहे. याशिवाय सातपूर भागातील एक्लो पॉइंट रस्त्यावरही खड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती आहे. खड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंचा हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Nashik Potholes: खड्डे की मृत्यूचा सापळा? खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी; नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

महापौर, आयुक्तांसह ठेकेदारांविरुद्ध याचिका

केवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापुरतेच हे नागरिक थांबणार नसून, आता प्रशासनाविरोधात थेट कायदेशीर लढा पुकारण्यात येणार आहे. खड्यांमुळे झालेल्या सर्व अपघाती मृत्यूंची सखोल माहिती गोळा केली जात आहे. या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल वेट महापौर, महापालिका आयुक्त, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अॅड. गिते यांनी जाहीर केले आहे. या कायदेशीर आणि रस्त्यावरील लढ्यामुळे नाशिकमधील रस्ते विकास आणि भ्रष्ट कारभाराचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

पक्षविरहित आंदोलन होणार

चालू पावसाळ्यात रस्त्यांची कामे पूर्ण होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत, या भीषण रस्त्यांचा मोठा आर्थिक फटका नाशिकच्या व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाला जागे करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेडा न घेता, सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने ‘खड्डयांची वारी’ हे जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा अॅड. अजिक्य गिते यांनी केली आहे. ठिकठिकाणी तीव्र निदर्शन केल्यानंतर हे आंदोलन थेट महानगरपालिकेवर धडकणार आहे. पुढील दोन दिवसांतच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचे गिते यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे चौकाचौकात आंदोलन

महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पडलेल्या खड्कुच्चांमुळे आतापर्यंत ५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. एक्स्लो पॉईंट चौकात खड्चामुळे दुचाकी घसरून निलेश प्रल्हाद कोतकर या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या खड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्यापासून शहरातील चौकाचौकात तीव्र जनआंदोलन छेडणार आहे.

Nashik Crime: 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर आत्महत्या, गर्भाच्या DNA ने उघड केला नराधमाचा चेहरा आणि…

Web Title: Nashik pothole deaths public interest litigation against municipal officials contractors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Road Accident

संबंधित बातम्या

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
1

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार
2

MHADA Lottery 2026: सर्वसामान्यांसाठी ‘म्हाडा’ची गुड न्यूज! ३३३ घरांची सोडत; विजेत्या अर्जदारांचा सत्कार

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना
4

गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार, सहावीतील विद्यार्थ्याने संपवलं जीवन; जळगावमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.