Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर ‘झाड लावा’ चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल

Navrashtra Impact : अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यात हजारो झाडांची कथित बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप. ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतरही १० दिवसांत कारवाईबाबत स्पष्टता नसल्याने पर्यावरणप्रेमी आक्रमक.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 27, 2026 | 08:45 PM
Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर 'झाड लावा' चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल

Navrashtra Impact: अहिल्यानगर वनविभागाचा निर्लज्ज कारभार: पोस्टरवर 'झाड लावा' चा संदेश, प्रत्यक्षात हजारो झाडांची कत्तल

Follow Us
Follow Us:
  • ‘नवराष्ट्र’च्या दणक्यानंतर खळबळ
  • कारवाईच्या नावाखाली केवळ थातूरमातूर नाटक
  • पर्यावरण प्रेमींकडून कारवाईची मागणी
 

पोपट पिटेकर, अहिल्यानगर

Navrashtra Impact : पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी आणि वसुंधरा हिरवीगार ठेवण्यासाठी शासकीय पातळीवर कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. खुद्द अहिल्यानगर उपवनसंरक्षक वनविभागाकडून फक्त ‘एक झाड लावा.. 50 वर्षांनंतर ते झाड आपल्याला किती उपयोगी पडते ते माहिती करून घ्या’ असे मोठे आकर्षक फलक लावले गेले आहेत. या पोस्टर्सच्या माध्यमातून एका झाडाचे महत्त्व सांगताना, झाडामुळे मिळणारे 15 लाख रुपयांचे ऑक्सिजन उत्पादन, 40 लाख रुपयांचे पाण्याचे रिसायकलिंग, 35 लाख रुपयांच्या किमतीचे वायू प्रदूषण रोखण्याचे फायदे आणि पक्षांचा आश्रयस्थान असण्याचे दाखले दिले जात आहेत. मात्र, सामान्य जनतेला पर्यावरणाचे गोड धडे देणाऱ्या याच वनविभागाच्या कार्यालयात काहींचे उखळ पांढरे चालले असून, या दांभिकतेमागील भयानक वास्तव आता चव्हाट्यावर आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि लाचखोर कर्मचारी यांच्या संगनमताने हजारो झाडांची बेसुमार, बेकायदेशीर आणि अमानुष कत्तल करण्यात आल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार ‘नवराष्ट्र’ने पुराव्यानिशी उघडकीस आणला आहे.

कारवाईचा केवळ फार्स; 10 दिवस लोटले तरीही ‘मूक बाधिरांचे’ सोंग!

‘नवराष्ट्र’ने हा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रशासनाकडून तात्काळ चौकशी आणि कारवाईचे आदेश दिल्याचा आव आणण्यात आला. परंतु, या गंभीर घटनेला तब्बल 10 दिवस उलटून गेले आहेत, तरीही दोषी अधिकाऱ्यांवर नेमकी कायदेशीर कारवाई करण्यात आली? याबाबत वनविभागाकडून अद्यापही कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. प्रसारमाध्यमे आणि पर्यावरणप्रेमींनी विचारणा करूनही अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.

Sai Dongar Deforestation : राज ठाकरेंना चक्क जैन मुनी निलेशचंद्र यांचा पाठिंबा! वृक्षतोडीवरून घेतली ठाम भूमिका

‘हप्तेबाजी’चा संशय आणि अधिकाऱ्यांचे लागेबांधे

वृक्षतोड करणाऱ्या तस्कर व लाचखोरांकडून मलिदा लाटण्यात आल्यामुळेच या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. शासकीय रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा सर्वसामान्यांनी दाद मागितली कुणाकडे? असा संतप्त सवाल शेवगाव तालुक्यातून विचारला जात आहे. वरिष्ठ पातळीवरील काही अधिकारी या भ्रष्ट सहकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे.

निसर्गाची ही टाळूवरील लोणी खाणारी लूट आणि मूक झाडांची चाललेली कत्तल पाहून जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी, वनप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते तीव्र आक्रमक झाले आहेत. आज ऑक्सीजनच्या अभावी लाखो लोक जीव गमावत असताना, हजारो डेरेदार आणि आयुष्यभर प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचा घास घेणाऱ्या या विकृत व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केवळ खानापूर्तीच्या निलंबनाची कारवाई करून चालणार नाही. या झाडांच्या कत्तलीमुळे अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या आणि पर्यावरणाचा जीव गुदमरणाऱ्या या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे.

Pune शहरावरील वाढीव पाणीकपातीचे संकट तूर्त टळले; पाण्याचे वर्षभराचे नियोजन होणार?

एकीकडे जाहिरातबाजीचा देखावा करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच आशीर्वादाने लाखो-करोड्यांची संपत्ती असलेल्या मुक्या वृक्षांची लाकूड माफियांसोबत मिळून माथी फोडायची, या दुतोंडी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. आता याप्रकरणी अहिल्यानगरचे मुख्य वनसंरक्षक आणि जिल्हा प्रशासन नेमकी काय कठोर भूमिका घेणार? आणि दोषी अधिकाऱ्यांवर बडगा उगारणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अहिल्यानगर वनविभागाबाबत कोणता आरोप करण्यात आला आहे?

    Ans: शेवगाव तालुक्यात वनविभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कथित संगनमताने हजारो झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: हे प्रकरण चर्चेत कसे आले?

    Ans: ‘नवराष्ट्र’ने वृक्षतोडीचे प्रकरण पुराव्यांसह उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. त्यानंतर वनविभागाच्या वर्तुळात खळबळ उडाल्याचे वृत्तात म्हटले आहे.

  • Que: पर्यावरणप्रेमींची काय मागणी आहे?

    Ans: कथित बेकायदेशीर वृक्षतोडीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

Web Title: Navrashtra impact ahilyanagar forest department illegal tree cutting shevgaon rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • environment
  • Forest Department

संबंधित बातम्या

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या
1

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…
2

Maharashtra Drought: देवाक काळजी रे! ‘या’ जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई; तातडीने पाण्याचे…

Bhimashankar मध्ये वृक्षतोड सुरू आहे की नाही? उडालेल्या संभ्रमानंतर वन विभागाकडून झाला ‘हा’ खुलासा
3

Bhimashankar मध्ये वृक्षतोड सुरू आहे की नाही? उडालेल्या संभ्रमानंतर वन विभागाकडून झाला ‘हा’ खुलासा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
4

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.