Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठ महिन्यांची गर्भवती… दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

दोन गंभीर प्रकरणांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू असतानाच निदा खानच्या वैवाहिक आयुष्यातही मोठा पेच निर्माण झाला आहे. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या निदाच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, आता १६ ऑक्टोबरला तिला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 02:17 PM
आठ महिन्यांची गर्भवती... दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

आठ महिन्यांची गर्भवती... दोन गुन्ह्यांत जामीन, आता पतीनेच मागितला घटस्फोट; निदा खानसमोर नवे संकट!

Follow Us
Follow Us:
  • आठ महिन्यांची गर्भवती निदा खानविरोधात पतीचा घटस्फोटाचा अर्ज
  • न्यायालयाचे समन्स; १६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश
  • दोन प्रकरणांत सशर्त जामीन; न्यायालयीन प्रक्रिया सुरू
नाशिक : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणी आणि तरुणाच्या कथित धर्मांतराच्या कटाच्या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या निदा एजाज खान हिच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात असतानाच तिच्या वैवाहिक आयुष्यातही मोठा पेच निर्माण झाला आहे. निदा आठ महिन्यांची गर्भवती असताना तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने निदाला समन्स बजावले असून, १६ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

दोन स्वतंत्र प्रकरणांत निदाचे नाव

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बहुराष्ट्रीय कंपनीतील एका तरुणीच्या तक्रारीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्यात याच कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन यांच्यासह निदा खान हिच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने निदाला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

बदनामीमुळे वैवाहिक आयुष्यात तणाव?

२६ मार्चपासून या प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे निदाच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. तिचे लग्न दोन ते तीन वर्षांपूर्वी झाले होते. या प्रकरणामुळे झालेली बदनामी आणि सामाजिक दबाव यामुळे तिच्या पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आठ महिन्यांचे गर्भारपण, सुरू असलेली कायदेशीर लढाई आणि आता पतीकडून दाखल करण्यात आलेला घटस्फोटाचा अर्ज, अशा परिस्थितीत निदासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा: Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

जामीन देताना न्यायालयाची संवेदनशील टिप्पणी

यापूर्वी निदाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने बाळाच्या हिताचा आणि मानवी हक्कांचा विचार केला होता. नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणाचा सामना करावा लागू नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. यावेळी न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत बाळाच्या हिताचे महत्त्व अधोरेखित केले होते. निदाला जामीन मिळाल्यानंतर आता तिच्या पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केल्याने या प्रकरणाला वैयक्तिक आयुष्यातील नवे वळण मिळाले आहे. १६ ऑक्टोबरच्या सुनावणीत पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Nida khan divorce case eight month pregnant nashik court summons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • crime news
  • Nashik Crime
  • Nashik News Update

संबंधित बातम्या

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!
1

Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

जुन्या वादाची कुरापत काढून तरुणाची हत्या; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्…; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
4

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.