Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Protest : ‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले असताना केंद्र सरकारने १२.३५ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली आहे. जाहीर केलेला दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 16, 2026 | 12:16 PM
‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • केंद्र सरकार कादा उत्पादकाना देणार ‘कवडीमोल’ दर
  • घोषणेनंतर शेतकरी संतप्त; आंदोलन छेडण्याचा इशारा
  • केंद्राकडून 12.35 रुपये किलो दराने खरेदीची घोषणा
लासलगाव : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या रक्ताचे पाणी करून पिकवलेला कांदा रस्त्यावर फेकण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘फिल्डिंग’ नंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १२.३५ रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली. मात्र, हा दर म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव मातीमोल झाले आहेत. काही ठिकाणी तर १ रुपया किलो दराने कांदा विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. या भीषण संकटातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे धाव घेतली. त्यांच्या विनंतीला मान देऊन १५ तारखेपासून ‘नाफेड’ आणि एनसीसीएफकडून खरेदीचा मुहूर्त काढण्यात आला.

मिरा-भाईंदरमध्ये पुतळ्यावरून रणकंदन! “व्यापारी स्वार्थासाठी शिवरायांचा पुतळा हटवण्याचा डाव”; प्रताप सरनाईकांचा भाजपवर घणाघात

खर्चही निघत नाही

एकीकडे विक्रमी उत्पादनाचा आनंद असताना, दुसरीकडे घाम गाळून पिकवलेल्या मालाला साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा संकटात आहे. १२ रुपयांची ही खरेदी शेतकऱ्याची ‘भूक’ भागवणार की फक्त ‘वेळ’ मारून नेणार, हाच आता कळीचा प्रश्न आहे. लाखो रुपयांचा खर्च करून हे तुटपूंजे दर देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याची प्रतिक्रिया उत्पादक शेखर कदम यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धाअशा परिस्थितीत केंद्राने जाहीर केलेली मदत तुटपूंजी असून, शेतकऱ्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा असे सरकारला वाटत असेल तर नाफेडने बेट बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रियेत उत्तरून खरेदी करावी, त्यामुळे स्पर्धा निर्माण होईल आणि शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होईल, अशी माहिती खासदार भास्कर भगरे यांनी दिली.

सन २०२३ मधील करून देत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०२३ मध्ये कांद्याच्या दरातील घसरणीनंतर २४१० प्रति क्विंटल दराने कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली होती. मग आज महागाई वाढलेली असताना केवळ १२३५ दर का दिला जात आहे? केंद्र शासनाने शेतकऱ्याऱ्यांची ही क्रूर थट्टा थांबवावी, अशी माहिती अध्यक्ष महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना भारत दिघोळे यांनी दिली.

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

Web Title: Onion procurement rate 12 35 rupees farmers reaction maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण
1

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! २०२७ मध्ये मेट्रोसारखी उपनगरीय लोकल; फडणवीसांकडून विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
2

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
4

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.