Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : आता नागरिकांना ‘PhonePe’ द्वारेही भरता येणार घरपट्टी, 10 महापालिकांचा समावेश

महानगरपालिकेकडून नागरिकांना ‘फोन पे’द्वारे घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या डिजिटल सेवेत देशातील १० महापालिकांचा समावेश करण्यात आला असून, यामुळे नागरिकांना घरबसल्या सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 09, 2026 | 11:42 AM
आता नागरिकांना 'PhonePe' द्वारेही भरता येणार घरपट्टी, 10 महापालिकांचा समावेश (फोटो सौजन्य-Gemini)

आता नागरिकांना 'PhonePe' द्वारेही भरता येणार घरपट्टी, 10 महापालिकांचा समावेश (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • आता नागरिकांना ‘PhonePe’ द्वारेही भरता येणार घरपट्टी
  • 10 महापालिकांचा समावे
  • नागरिकांना मनपाची ही सुविधा मिळणार
Nashik News Marathi: नाशिक महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात असून, सध्या मनपाच्या संकेतस्थळावरून मिळकतधारकांना घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन पध्दती भरता यावी व कर भरणा अधिक सोयीस्कर आणि सोपे व्हावे, यासाठी ‘फोन पे’ चा मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसात नागरिकांना मनपाची ही सुविधा मिळणार आहे.

जकात आणि जकातीनंतर एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) च्या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत होते. राज्य शासनाने एलबीटी रद्द करत त्याजागी जीएसटी लागू करण्यात आला. एलबीटी रद्द करताना त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर आठ टक्के वाढ गृहीत धरून राज्य शासनाकडून महापालिकेला जीएसटीच्या माध्यमातून परतावा दिला जात आहे.

Kumbha Mela Tender Scam: १५ हजार कोटींचा निधी आणि कमिशनचा खेळ? कुंभमेळा टेंडरमध्ये गिरीश महाजनांचा उल्लेख

यूपीआयशी जोडणी

फोन पेच्या माध्यमातून नागरिकांना फोन पे वरील म्युनिसिपल टॅक्स या ऑप्शनमध्ये नाशिक महापालिकेवर क्लिक करून आपला कर भरणा करता येणार आहे. या सेवेसाठी नाशिक महापालिकेने भारत पे अर्थात, युपीआयशी आपले सॉप्टवेअरची जोडणी केली आहे. सध्या फोन पे वरील म्युनिसिपल टॅक्समध्ये दहा महापालिकांसह काही ग्रामपंचायत, नगरपरिषदांचा समावेश असून, आता नाशिक मनपाही समाविष्ट होणार आहे.

निम्म्याहून अधिक नागरिक ऑनलाईन सुविधेचा लाभ घेतात

गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला दरमहा १२४ कोटी ८५ लाख रूपयांचा उत्पन्न परताव्यातून मिळाले. महापालिकेला उत्पन्न मिळण्याचा हा सर्वात मोठा घटक आहे. त्याखालोखाल महापालिकेला घरपट्टी आणि पाणीपट्टीतून महसूल मिळत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून महापालिकेच्या या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे. यामुळे यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने मिळकतधारकांना कर भरतांना अधिकाधिक सोयीस्कर व्हावे, याअनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत. सध्या एनएमसी ई-कनेक्ट अॅप तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन कर भरण्याची सुविधा मनपाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या मिळकतधारकांना कर सवलत योजनेअंतर्गत अधिकची दोन टक्के सवलत दिली जात असल्याने ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होतांना दिसत आहे. एकूण सहा लाख मिळकतधारकांची मनपाकडे नोंद असून, यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक लोक ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे या सुविधेत आणखी वाढ व्हावी, याअनुषंगाने महापालिकेच्या विविध कर आकारणी विभागाने आता संकेतस्थळाबरोबरच फोन पे व्दारे देखील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून, येत्या पंधरा दिवसात ही सुविधा नागरिकांच्या सेवेत हजर होणार आहे.

युपीआयबरोबर ” मनपाने संपर्क कार्यवाही पूर्ण केली आहे. येत्या काही दिवसात साधत संपूर्ण नागरिकांसाठी फोन पे व्दारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कर भरणा अधिकाधिक सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे, अशी माहिती उपायुक्त कर विभाग अजित निकत यांनी दिली.

Nashik News : शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा; मार्च, एप्रिल महिन्यात ५७ हजार हेक्टरवरील पिके झाली उद्ध्वस्त

Web Title: Property tax payment via phonepe municipal corporation adds 10 cities digital service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • Nashik
  • phonepe
  • Property Tax

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम
1

Ganeshotsav 2026: ७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी
2

Nashik Kumbh Mela Fund Approved : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल इतक्या कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर; नगरविकास विभागाचा GR जारी

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा
3

Nashik Bus Stand: बसस्थानकच आले रस्त्यावर! तीन महिने प्रवाशांचे हाल, सिटीलिंकच्या केवळ एका बसला जागा

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ
4

Ganpati Decoration 2026: यंदा बाप्पाची आरास खिशाला कात्री लावणार! डेकोरेशन साहित्याच्या किमतीत 20 ते 30 टक्के वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.