Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक

महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून नाशिक शहरात भाजपचे इनकमिंग थांबायला तयार नाही. तर दुसरीकडे भाजपाच्या दिमतीला कॉग्रेसचे नगरसेवक दिमतीला दाखल झाल्याचे पाहून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 26, 2025 | 11:32 AM
एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक

एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक

Follow Us
Follow Us:
  • नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप
  • राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट
  • पक्षात उरला एक नगरसेवक
नाशिक : नाशिकमध्ये भाजपने नुकताच एक मोठा राजकीय भूकंप घडवला आहे.पालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनसेचे मोठे नेते दिनकर पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ तसेच काँग्रेसचे शाहू खैरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान स्व. शांताराम बापू वावरे, स्व. पंडीतराव खैरे आणि त्यानंतर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी काँग्रेसच्या रूपाने नाशिक महापालिकेत महापौर म्हणून यशस्वी कारकिर्द स्वबळावर गाजविलेली असतांना आज त्याच काँग्रेसमध्ये वत्सला खैरे यांच्या रूपाने एकमेव नगरसेवक शिल्लक राहिला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपाला देशपातळीवर काँग्रेस पर्याय होऊ पहात असतांना त्याच भाजपाच्या दिमतीला कॉग्रेसचे नगरसेवक दिमतीला दाखल झाल्याचे पाहून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.

“जिहादी मानसिकता चिरडून टाकू, शिवसेना आमचा मुख्य…” मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या शहरात काँग्रेसची अवस्था एकाकी झाली आहे. गेल्या निवडणूकीत सहा नगरसेवक काँगेस पक्षाकडून निवडून आले. त्यात प्रामुख्याने शाहू खैरे, वत्सला खैरे, राहूल दिवे, आशा तडवी, समीर कांबळे व डॉ. हेमलता पाटील यांनी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व केले. मात्र पाच वर्षांची कारकिर्द पुर्ण झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मिळाली नसल्याचे कारण पुढे करीत डॉ. हेमलता पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला व तेथेही कामकाजाला कोणताही वाव नसल्याचे सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. तर समीर कांबळे यांनी काही महिन्यांपुर्वीच शिंदे गटात प्रवेश केला व दोन दिवसांपुर्वी राहूल दिवे, आशा तडवी यांनीही तीच वाट चोखाळली. कॉग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या खैरे परिवारातील शाहू खैरे यांनी गुरूवारी (25 डिसेंबर 2025) भाजपात प्रवेश करून आपली निष्ठा समर्पण केली आहे. आता एकमेव वत्सला खैरे याच पक्षात उरल्या आहेत. पक्षाच्या या अवस्थेला पक्षांतर्गत गटबाजीचे कारण दिले जात असले तरी, जिकडे सत्ता तिकडे निष्ठा वाहण्याच्या वाढत चाललेल्या प्रवृतीचे हे द्योतक असल्याचे पक्षाच्या निष्ठावंतांचे म्हणणे आहे.

महापालिकेत डॉ. शोभा बच्छाव या शेवटच्या कॉंग्रेसच्या महापौर म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल. आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणूकीतही काँग्रेसची अवस्था बिकट असून, पक्ष संघटनेच्या नावे चोंबाबोंब असतांना अवास्तव जागांची मागणी व त्यातून स्वबळाचे दिले जाणारे फुकाचे नारे पाहता, निवडणूकीत पुन्हा एकदा पक्षाच्या उरले सुरले अस्तित्व देखील पणाला लागणार आहे.

Meenakshi Shinde Resignation: निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिंदेंना मोठा धक्का! माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

Web Title: The condition of the national party congress in nashik has become dire only one corporator remains in the party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nashik
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
3

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
4

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.