Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : नाशिकच्या रात्रींमध्ये मुंबईचा नजारा, ‘सूफी जीन ईद बाजार’ ठरले राज्यातील दुसरे मोठे आकर्षण

स्थानिक नगरसेवक सुफियान (सूफी) जीन आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या बाजाराला एखाद्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नाशिकच्या 'सूफी जीन बाजार'ला दुसरे स्थान मिळाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 16, 2026 | 07:40 PM
नाशिकच्या रात्रींमध्ये मुंबईचा नजारा, 'सूफी जीन ईद बाजार' ठरले राज्यातील दुसरे मोठे आकर्षण

नाशिकच्या रात्रींमध्ये मुंबईचा नजारा, 'सूफी जीन ईद बाजार' ठरले राज्यातील दुसरे मोठे आकर्षण

Follow Us
Follow Us:

नाशिक: रमजानच्या पवित्र महिन्याच्या सुरुवातीसोबतच संपूर्ण ‘जुने नाशिक’ परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला आहे. शहराचा ऐतिहासिक ‘दूध बाजार’ परिसर सध्या ‘सूफी जीन बाजार’ या आपल्या नवीन ओळखीमुळे केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक नगरसेवक सुफियान (सूफी) जीन आणि त्यांच्या टीमच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या बाजाराला एखाद्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

नुकत्याच झालेल्या एका व्यापारी सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील पहिल्या १० ईद बाजारांच्या यादीत नाशिकच्या ‘सूफी जीन बाजार’ला दुसरे स्थान मिळाले आहे. शहरासाठी ही अभिमानाची बाब असून, येथील व्यवस्था आणि गर्दी आता मुंबईच्या मोहम्मद अली रोडसारख्या प्रतिष्ठित बाजारांना टक्कर देत आहे. या बाजाराने मुंबईच्या मोहम्मद अली रोड वरील बाजारालाही सर्व्हेक्षणात मागे टाकले असून, भेंडी बाजार, माहीम, मिरारोड येथील रमजान बाजारही फिका पडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज सुमारे २५ ते ३० हजार ग्राहक बाजाराला भेट देत असून, सेफ्टी पीनपासून ते लहान मुले वृद्धांना लागणाऱ्या सर्व वस्तू येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या शिवाय खान-पानाची चंगळ वेगळीच.

 नाशिककरांना मार्च महिन्यातच पाणी टंचाई; १३ टँकरद्वारे करावा लागतोय पाणी पुरवठा

एकाच छताखाली सर्व काही

बाजारात खरेदीसाठी उसळणाऱ्या गर्दीचे मुख्य कारण म्हणजे येथे मिळणारी विविधता आणि किफायतशीर दर, येथे उपलब्ध असलेल्या प्रमुख वस्तूमध्ये नवीन फॅशनची बरोबरी साधण्यात दुकानदारांनी कोणतीही कमतरत्ता ठेवलेली नाही. अत्तराचा घमघमाटापासून ते धरसामानाच्या सजावटीच्या वस्तुनी डोळे दिपवून टाकत आहेत.

रात्रभर झगमगणारी रौनक

सूर्य मावळताच या बाजाराचे खरे सौंदर्य उलगडते. आधुनिक एलईडी लाईट्स आणि रंगीबेरंगी सजावटीमुळे संपूर्ण परिसर दिवसासारखा चमकतो. या बाजाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘नाईट कल्चर’, इफ्तारनंतर सुरू होणारा हा बाजार पहाटे सहरीपर्यंत आपल्या पूर्ण वैभवात असतो.

हजारो हातांना रोजगार, लाखोंची होतेय उलाढाल

नगरसेवक सूफी जीन यानी आयोजित केलेल्या या बाजारामुळे केवळ ग्राहकांनाच नव्हे, तर विक्रेत्यांनाही मोठे व्यासपीठ मिळाले आहे. येथे हजारो स्थानिक दुकानदार आपली दुकाने थाटतात, ज्यातून त्यांची वर्षभरातील सर्वात मोठी कमाई याच एका महिन्यात होते, नाशिक शहराव्यतिरिक्त मालेगाव, येवला, निफाड आणि सिन्नर यांसारख्या भागांतूनही हजारो लोक येथे खरेदीसाठी येत आहेत.

बाजारातील वाढती गादी लक्षात घेऊ स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत, जे वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतात. हा बाजार केवळ व्यापाराचे केंद्र नसून नाशिकच्या ‘गंगा-जमुनी’ संस्कृतीचे प्रतीक आहे, जिथे सर्व धर्म आणि वगचि लोक या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी आणि खरेदीसाठी येतात, अशी माहिती आयोजक नगरसेवक सुफी जीन यांनी दिली.

Nashik News : हजारो विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, जिल्ह्यातील वसतिगृह आश्रमशाळांना भासतेय व्यावसायिक सिलिंडरची भ्रांत

Web Title: The view of mumbai in the nights of nashik sufi jean eid bazaar has become the second biggest attraction in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • tourism

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.