Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Nashik News: रामवारी आणि श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होणार असल्याने रस्त्यांवरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि खड्ड्यांमुळे भाविकांच्या प्रवासासोबतच वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 11:38 AM
रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! रामवारी-श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला उसळणार भाविकांची गर्दी

रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! रामवारी-श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला उसळणार भाविकांची गर्दी

Follow Us
Follow Us:
  • खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास!
  • त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविक उतरणार
  • खराब रस्त्यांमुळे वाहतूक नियोजनाची पोलिसांसमोर कसोटी
नाशिक : श्रावण महिन्यातील शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार आणि अजा एकादशीचा दुहेरी शुभयोग साधत सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) नाशिकमधून ऐतिहासिक ‘रामवारी निघत आहे. काळाराम मंदिर ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर निघणाऱ्या या पदयात्रेत यंदा नाशिक शहरासह गिरणारे, गंगापूर, वाडीव-हे परिसरातील तब्बल २० ते २५ हजार भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. (Nashik News)

मात्र, यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली खोदकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि एकाच वेळी होणारी प्रचंड गर्दी यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी परीक्षा पाहणारा हा सोमवार ठरणार आहे. मागील तीन श्रावणी सोमवारी पोलीस प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने गर्दीवर नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत ठेवली होती. मात्र, आज (७ सप्टेंबर) सातपूरपासून थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत रस्त्यावर भाविकांचा अथांग सागर असणार आहे. त्यामुळे गेल्या तीन सोमवारी यशस्वी झालेले पोलीस नियोजन यंदा खऱ्या अर्थाने पणाला लागणार आहे.

Wine Capital of India: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘या’ शहराला म्हणतात भारताची ‘वाइन कॅपिटल’?

रस्त्यांवर चिखल आणि धोक्याचे वळण

२००५ सालापासून सुरू झालेली ही रामवारी दरवर्षी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत शहरातून बाहेर पडते. साधारण दुपारी अंजनेरी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतात. दरवर्षी सकाळीच वारी शहराबाहेर पडत असल्याने तिचा वाहतुकीवर फारसा परिणाम होत नव्हता आणि शहरात फारशी चर्चाही होत नव्हती. परंतु, यंदा परिस्थिती अत्यंत भीषण आहे. सातपूरच्या पुढे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, ठिकठिकाणी उघडे चेंबर्स, साचलेला चिखल आणि त्यातच एकेरी (सिंगल लेन) वाहतूक यामुळे पदयात्री भाविकांच्या आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

समन्वयातून वाहतूक आणि बंदोबस्ताचे केले नियोजन

रामवारी आणि आवणी सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दिडीने त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जातील. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या समन्वयाने खासगी वाहतूक नियंत्रीत केली जाईल. धोकादायक ठिकाणी बॅरकेडींग अथवा मनुष्यबळ उपलब्ध करून भाविकांना सुरक्षित प्रवास करता येईल, याची काळजी घेण्यात येईल. -डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक

चौथ्या सोमवारी भाविकांचा ओघ

रविवारी (दि. ६ सप्टेंबर) तिसऱ्या सोमवारी झालेली प्रचंड गर्दी पाहता, अनेक भाविकांनी उद्या चौथ्या सोमवारी दर्शन आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे नियोजन केले आहे. त्यातच एकादशीचा योग आणि पदयात्रेतून येणारे हजारो भाविक यामुळे त्र्यंबकेश्वरनगरीत गर्दीचा टक्का दुपटीने वाढणार असून पोलिसांवरील ताण प्रचंड वाढणार आहे.

अमृत गार्डन येथेच खासगी वाहनांना अटकाव

रामवारी आणि श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात विशेष बदल करण्यात आले आहेत. तळेगाव येथे मुख्य पार्किंग असून, तेथून केवळ एसटी बसेसच त्र्यंबकेश्वरकडे सोडल्या जातात. मात्र, तळेगावपर्यंत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातपूर येथील अमृत गार्डन बायपासवरूनच खासगी वाहने नियंत्रित केली जातील. केवळ स्थानिक आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पुढे सोडले जाईल. ज्या एकेरी रस्त्यांवर धोका आहे, तिथे तात्पुरते बॅरिकेडिंग केले जात असून, अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.

Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय

Web Title: Trimbakeshwar road condition challenge for police ahead of ramwari and shravani somvar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार
1

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
2

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
3

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
4

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.