Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई

Nashik News: गोदावरी नदीचा पूर ओसरल्यानंतर नाशिकच्या रामकुंड परिसरातील गोदापात्रात वाहनधारकांकडून उघडपणे दुचाकी व चारचाकी वाहने धुतली जात आहेत. तेल, ग्रीस आणि डिटर्जंटयुक्त पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 01:05 PM
पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई

पूर ओसरताच गोदापात्र बनले ‘खुले सर्व्हिस स्टेशन’; वाहनधारकांकडून सर्रास वाहन धुलाई

Follow Us
Follow Us:
  • पंचवटीतील गोदाघाट की ‘सर्व्हिस स्टेशन’?
  • पूर ओसरताच गाड्या धुण्यासाठी गोदापात्रात नागरिकांनी केली गर्दी
  • गोदावरीच्या पात्रात वाहन धुलाईचा सुळसुळाट
राजू ठाकरे। पंचवटी (वा.) : गोदावरीचा पूर ओसरल्यानंतर रामकुंड आणि परिसरातील गोदापात्राला सध्या ‘खुले सर्व्हिस स्टेशन’चे स्वरूप आले आहे. पुराचे पाणी कमी होताच स्थानिक नागरिक तसेच वाहनधारकांनी आपापल्या दुचाकी व चारचाकी गाड्‌या धुण्यासाठी गोदापात्रात उघडपणे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पात्रातच वाहने धुवून तेल, ग्रीस आणि डिटर्जंटचे पाणी थेट नदीत सोडले जात असूनही महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे या गंभीर प्रकाराकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला होता. कालपासून पुराचे पाणी ओसरल्याने गोदा घाट परिसर मोकळा झाला आहे. मात्र, या ओसरलेल्या पाण्याचा गैरफायदा घेत अनेक वाहनधारक थेट गोदापात्रातच वाहने उतरवून ती धुताना दिसत आहेत.

Wine Capital of India: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘या’ शहराला म्हणतात भारताची ‘वाइन कॅपिटल’?

प्रदूषण थेट गोदावरी पात्रात

वाहनांच्या धुराची काजळी, इंजिनचे तेल, ग्रीस आणि रासायनिक साबण-डिटर्जेंट थेट गोदावरीच्या पवित्र जलात मिसळत आहे. त्यामुळे पाण्यावर तेलाचे थर साचले असून नदीच्या जैविक विविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

गोदावरी संवर्धनासाठी नाशिक महानगरपालिकेत स्वतंत्र ‘गोदावरी संवर्धन कक्ष’ कार्यरत असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्या कक्षाने नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आजवर कोणती ठोस आणि दृश्यमान कामगिरी केली, याचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडला जावा. कारण प्रत्यक्षात रामकुंडासारख्या देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी उघडपणे वाहने धुतली जात आहेत आणि संबंधित यंत्रणा कारवाई करताना दिसत नाही, गोदावरी संवर्धनासाठी खर्च होणारा निधी आणि प्रशासनाचे दावे केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे,अशी प्रतिक्रिया गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिली.

रामकुंड है हिंदू धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असून जगभरातून हजारो भाविक येथे अस्थी विसर्जन, श्राद्ध, पिंडदान आणि अन्य धार्मिक विधीसाठी येतात. गोदावरी नदी येथे दक्षिणवाहिनी होत असल्याने या क्षेत्राला ‘दक्षिणकाशी म्हणूनही ओळखले जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्रात वाहने धुण्याचे प्रकार अत्यंत निषेधार्ह असून त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावतात आणि तीर्थक्षेत्राच्या पावित्र्यालाही धक्का पोहोचतो, शासन व प्रशासनाने अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करून संबंधितांवर मोठा दंड आकारावा, तसेच भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती पुरोहित संघ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिली.

Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय

Web Title: Vehicles washed in godavari riverbed after flood recedes nashik environment concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.