Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai: नवी मुंबईत गणेशोत्सवाची लगबग; शाडूच्या गणेशमूर्ती १२ ते १५ टक्क्यांनी महाग

यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना नवी मुंबईतील गणेशमूर्ती बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला वाढता प्रतिसाद मिळत असला तरी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • शाडूच्या गणेशमूर्तींच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांची वाढ.
  • पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे शाडूच्या मूर्तींना मोठी मागणी
  • वाशी, नेरुळ, बेलापूर, घणसोलीसह अनेक ठिकाणी मूर्ती तयार करण्याची लगबग
 

यंदाच्या गणेशोत्सवाला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना नवी मुंबईतील गणेशमूर्ती बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिक प्रभावीपणे रुजत असतानाच शाडूच्या गणेशमूर्तीच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने भाविकांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या खर्चातही वाढ होणार आहे.

दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा २८ फुटांपेक्षा उंच मूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडून अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी आणि सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तीना यंदाही मोठी मागणी असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार करून अनेक भाविक प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी शाडूच्या मूर्तीना पसंती देत आहेत. मात्र शाडूची माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च तसेच मजुरीत झालेली वाढ यामुळे मूर्तीच्या किमती वाढल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. वाशी, तुर्भे, नेरुळ, बेलापूर, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोलीत लहान-मोठ्या मूर्ती कार्यशाळा कार्यरत आहेत. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असून हजारो कारागिरांना रोजगार उपलब्ध होतो.

Thane Siddheshwar Temple: ठाण्यातील सिद्धेश्वर मंदिर का आहे खास? जाणून घ्या नर्मदेश्वर शिवलिंगाचे धार्मिक महत्त्व

घणसोलीतील २७ फूट उंच मूर्तीचीही ऑर्डर

घणसोली गावातील मूर्तिकार रोहिदास महादू पाटील यांच्या श्री गणेश कला निकेतन कार्यशाळे दरवर्षी सुमारे १५०० ते २००० गणेशमूर्ती साकारल्या जातात. त्यापैकी १५० ते २०० मूर्ती शाडूच् असतात. यंदा घणसोलीतील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने २७ फूट उंचीच्या गणेशमूर्ती ऑर्डर दिली असून ही परिसरातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागरूकता

नद्या, तलाव आणि समुद्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था सातत्याने शाडूच्या गणेशमूर्तीचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र आहे. अनेक मंडळांनीही यंदा आकर्षक सजावटीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष चोलकर यांनी सांगितले की, मुंबई, पनवेल आणि ठाणे महापालिकांकडू मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देणे, वीज पाणीपुरवठा, तात्पुरते शेड आणि अन्य मूलभूत सुविध पुरवल्या जातात. मात्र नवी मुंबई महापालिकेकडून अश सुविधा अद्यापही उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली.

कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर महापालिकेची नजर; स्ट्रक्चरल ऑडिट न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पर्यावरणपूरक संकल्पनांवर भर

यंदा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आकर्षक सजावटीसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यंदा शाडूच्या गणेशमूर्तींच्या किमती का वाढल्या आहेत?

    Ans: शाडूची माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक आणि मजुरीचा खर्च वाढल्यामुळे मूर्तींच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • Que: शाडूच्या मूर्ती पर्यावरणासाठी कशा फायदेशीर आहेत?

    Ans: शाडूच्या मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात आणि पीओपीच्या मूर्तींच्या तुलनेत जलप्रदूषण कमी करतात.

  • Que: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी भाविकांनी काय करावे?

    Ans: शाडूच्या गणेशमूर्तींची निवड करावी, नैसर्गिक सजावटीचा वापर करावा आणि शक्य असल्यास कृत्रिम किंवा घरगुती विसर्जनाचा पर्याय स्वीकारावा.

Web Title: Navi mumbai ganeshotsav 2026 shadu ganesh idols price hike 12 to 15 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Ganeshotsav
  • maharashtra
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
1

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
2

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.