फोटो सौजन्य: Pinterest
Renault ने हा विक्रम 18 डिसेंबर रोजी मोरोक्कोमधील UTAC टेस्ट सर्किटवर नोंदवला. या टेस्टिंगदरम्यान Filante Record 2025 सरासरी 102 किमी/तास वेगाने धावली. संपूर्ण 1,008 किमीचा प्रवास कारने 9 तास 52 मिनिटांत पूर्ण केले आहे.
Hyundai च्या ‘या’ Car ने फोडला इतर ब्रँड्सना घाम! 2025 मध्ये दररोज विकले गेले 550 युनिट्स
या रेकॉर्डमागे कारची बॅटरी महत्त्वाची भूमिका बजावते. Filante Record 2025 मध्ये 87 kWh क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे, जी Renault Scenic E-Tech Electric मध्येही दिली जाते. फरक बॅटरीच्या आकारात नाही, तर ऊर्जा कार्यक्षमतेत आहे. या डेमो कारने केवळ 7.8 kWh प्रति 100 किमी इतकी ऊर्जा वापरली आहे, जी आजच्या बहुतांश प्रॉडक्शन EV पेक्षा खूपच कमी आहे.
इतकेच नव्हे, तर 1,008 किमी प्रवास केल्यानंतरही बॅटरीत 11% चार्ज शिल्लक होता. त्यामुळे ही कार 100 किमी/तासाहून अधिक वेगाने आणखी सुमारे 120 किमी चालू शकली असती.
मोठी बॅटरी बसवण्याऐवजी Renault ने कारच्या डिझाइन आणि इंजिनिअरिंगवर भर दिला. Filante Record 2025 चे वजन अवघे 1,000 किलोग्रामआहे. यासाठी कार्बन फायबर आणि हलक्या ॲल्युमिनियम पार्ट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. काही घटक 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत.
Renault Filante Record 2025 ही केवळ विक्रम करणारी कार नसून, ती एक चालती-बोलती टेक्नॉलॉजी बेस्ड कार आहे. यात Steer-by-wire आणि Brake-by-wire सिस्टिम देण्यात आल्या असून, पारंपरिक मेकॅनिकल लिंक काढून टाकण्यात आल्या आहेत. Michelin ने या कारसाठी खास लो-रोलिंग-रेझिस्टन्स टायर्स तयार केले आहेत, तर पावरट्रेन, चेसिस आणि कार्बन स्ट्रक्चरचे काम Ligier ने केले आहे.
Renault च्या मते, इलेक्ट्रिक वाहनांची प्रत्यक्ष वापरातील रेंज वाढवण्यासाठी नेहमीच मोठी बॅटरी आवश्यक नाही. कार हलकी असेल, उत्तम एअरोडायनामिक्ससह डिझाइन केली असेल आणि ऊर्जा नुकसान कमी केले गेले, तर उत्कृष्ट रेंज मिळवता येते. जरी Filante Record 2025 प्रॉडक्शनमध्ये आणण्याची कंपनीची योजना नसली, तरी या कारमधील इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान भविष्यातील Renault इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.






