Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Cidco : नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर; मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासनाचा मोठा निर्णय

Navi Mumbai Cidco : खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश; मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 07:22 PM
navi mumbai news

navi mumbai news

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
  • मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासनाचा मोठा निर्णय
Navi Mumbai Cidco :  मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेली अनेक वर्ष नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्राधिकरणे एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने रेल्वे प्रवासी मात्र यात भरडला जात होता. खासदार नरेश म्हस्के यांनी याची गंभीर दखल घेत दोन्ही प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समन्वय घडवून आणत नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथील मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन येत्या ६ महिन्यात सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके मध्ये रेल्वेकडे हस्तांतरण, पावसाळापूर्व कामे, दैनंदिन कामे करण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केल्याने आता नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Mumbai Pollution : विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

नवी मुंबई परिसरातील रेल्वे स्थानकांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अपुऱ्या प्रवासी सुविधांबाबत खासदार म्हणून नरेश म्हस्के यांनी पदभार स्विकारल्यापासून प्रवाशांच्या सतत तक्रारी प्राप्त होत होत्या. या समस्यांची दखल खासदार नरेश म्हस्के घेतली होती. ‘रेल्वे सल्लागार समिती’ चे सदस्य या नात्याने समितीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकांमध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी हा विषय वारंवार मांडला. स्थानकांची झालेली पडझड, देखभालीचा अभाव आणि सुरक्षेचा प्रश्न यामुळे सामान्य प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.


तसेच वाशी ते बेलापूर आणि खारघर ते खांदेश्वर या स्थानकांसाठीचे देखभाल करार अनुक्रमे २००३ आणि २००८ मध्ये संपले आहेत. त्यानंतर कोणताही नवा करार झालेला नाही. तर धक्कादायक बाब म्हणजे ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, बामणडोंगरी, खारकोपर आणि खारघर या स्थानकांसाठी आजतागायत एकही देखभाल करार करण्यात आलेला नाही. या गोष्टी खासदार नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर याची गंभीर दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले.

Sanjay Shirsat: “इंधन दरवाढीचा निवडणुकांशी काडीचाही संबंध नाही!” मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले

Web Title: Navi mumbaikars train journey will be comfortable big decision by railways and cidco administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • central railway
  • cidco news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: घणसोली एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
1

Navi Mumbai News: घणसोली एमआयडीसी परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची विजयी आगेकूच; माटुंगा वर्कशॉपला चारली धूळ
2

Kabaddi Tournament : रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची विजयी आगेकूच; माटुंगा वर्कशॉपला चारली धूळ

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
3

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा
4

Central Railway: लोकल वेळेवर, तरी कार्यालयात लेटमार्क! मशीद स्थानकातील गैरसोयीला ‘नवराष्ट्र’ने फोडली वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.